Budget 2020 नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पात नव्या कर रचनेची घोषणा केली आहे (Tax rate Tax slabs in Budget 2020). जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के, 5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल. (Tax rate Tax slabs in Budget 2020).
कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केल्याप्रमाणे मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर लागणार आहे. यानंतर 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर असेल. या कररचनेची घोषणा होण्याआधी 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर होता.
Union Budget Live : कररचनेत बदल, अडीच ते 5 लाखांवर 5 टक्के कर https://t.co/63pAWpXwkM #Budget2020 pic.twitter.com/WxxJieOGG7
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2020
7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के कर द्यावा लागणार आहे. आधी हा 20 टक्के होता. 10 लाख ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील 30 टक्के कर आता 20 टक्के करण्यात आला आहे. 12.5 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्नापर्यंत 30 टक्क्यांऐवजी 25 टक्के कर आकारण्यात येईल. मात्र, करसवलत मिळवण्यासाठी काही अटी देखील सांगण्यात आल्या आहेत.
जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के, 5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.
कर सवलत कशी मिळणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत घोषणा केलेल्या कररचनेला जुन्या कररचनेचाही पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे करदात्यांना जुनी किंवा नवी कररचना स्वीकारता येणार आहे. मात्र, नव्या कररचनेतील कर सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर मागील कररचनेनुसार मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच नव्या कररचनेचा फायदा घेतला तर विमा, गुंतवणूक, घराचं भाडं, मुलांचं शिक्षण सारख्या एकूण 70 मुद्द्यांवरील सूट मिळणार नाही. जुन्या कररचनेप्रमाणे कर भरला तर मात्र या 70 मुद्द्यांवरील सवलत घेता येईल.
नव्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचा दर 15 टक्के करण्यात आला आहे. जुन्या कंपन्यांसाठी हा कर 22 टक्के असणार आहे. कंपन्यांना देखील नवी आणि जुनी कररचना निवडण्याचा पर्याय आहे.
कर प्रक्रिया सोपी करण्याचा प्रस्ताव
एकूणच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या कररचनेत मागील वर्षीप्रमाणेच घोषणा केली आहे. 5 ते 15 लाख रुपये उत्पन्न गटाला मात्र काहिसा दिलासा मिळाला आहे. या गटांना 5 ते 10 टक्क्यांचा फायदा मिळाला आहे.
व्हिडीओ: