‘या’ ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा IPL प्रकरणी विमा कंपनीविरोधात 15.3 लाख डॉलरचा खटला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : मागील वर्षी दुखापतग्रस्त झाल्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात खेळू न शकणाऱ्या मिशेल स्टार्कने आपल्या विमा कंपनीकडून 15.3 लाख डॉलर मिळावे यासाठी खटला दाखल केला आहे. स्टार्कला केकेआरने जवळजवळ 18 लाख डॉलरची (9.4 कोटी रुपये) बोली लावून संघात घेतले होते. त्यानंतर स्टार्कने एक विमा घेतला. या विम्यात तो आयपीएल खेळू शकला नाही, तर […]

या ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूचा IPL प्रकरणी विमा कंपनीविरोधात 15.3 लाख डॉलरचा खटला
Follow us on

मुंबई : मागील वर्षी दुखापतग्रस्त झाल्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात खेळू न शकणाऱ्या मिशेल स्टार्कने आपल्या विमा कंपनीकडून 15.3 लाख डॉलर मिळावे यासाठी खटला दाखल केला आहे.

स्टार्कला केकेआरने जवळजवळ 18 लाख डॉलरची (9.4 कोटी रुपये) बोली लावून संघात घेतले होते. त्यानंतर स्टार्कने एक विमा घेतला. या विम्यात तो आयपीएल खेळू शकला नाही, तर अशा स्थितीत 15.3 लाख डॉलर मिळण्याची तरतुद होती. स्टार्कने या विम्यासाठी 97,920 डॉलर रुपयेही भरले होते.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्क मागील वर्षी दुखापत झाल्याने केकेआर संघात एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने विमा कंपनीकडून विमा तरतुदीनुसार अगोदरच निश्चित रक्कम मिळवण्यासाठी विक्टोरियन काउंटी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

दरम्यान, स्टार्कने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून (RCB) खेळताना 27 सामन्यांमध्ये 20.38 च्या सरासरीने एकूण 34 बळी घेतले होते. त्याने आयपीएलच्या 2014 आणि 2015 हंगामातही सहभाग घेतला होता. त्याने 15 धावा देत 4 बळी घेतले होते. ही त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे.

पाहा व्हिडीओ: