नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : रिच डॅड, पुअर डॅड (Rich Dad Poor Dad) हे जगभरात गाजलेले आणि सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. या पुस्तकामुळे अनेक पालक भारवलेले आहे. पैशांचे नियोजन आणि व्यवस्थापनाचे महत्व अनेक पालक ओळखून आहेत. त्यांना हे पुस्तक भावले आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, तर अनेक जण हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला ऐकून, वाचून धक्का बसेल की, श्रीमंतीचा मंत्र देणारा या पुस्तकाचा ख्यातनाम लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) स्वतःचा कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. त्याच्या डोक्यावर 1 अब्ज डॉलरहून अधिकचे कर्ज आहे. पण कियोसकी म्हणतो, कर्ज ही त्याची काही समस्या नाही, तर कर्ज हाच पैसा आहे.
कर्जाची केली सुरेख व्याख्या
एक इन्स्टाग्राम रीलमध्ये कियासोकी याने कर्जावर त्याचे विचार मांडले आहे. त्याला कर्जाचे तत्वज्ञान म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याने कर्जाची फारच सुरेख व्याख्या केली आहे. त्याच्या मते, संपत्ती (Assets) आणि देणेदारी (Liabilities) यामधील जो फरक आहे, त्याला कर्ज म्हणता येईल. जगात कित्येक लोक कर्जाचा वापर गरजा भागविण्यासाठी करतात. प्रसंगी याची टोपी त्याच्या डोई ठेवतात. त्यांच्याकडे असणाऱ्या रोल्स रॉयस, फेरारी या कार पण कर्ज घेऊनच खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.
”कर्ज हाच पैसा”
कियोसाकी यांनी त्यांच्या डोईवर असलेल्या कर्जाची पण माहिती दिली. त्यांनी याविषयीच्या पॉडकॉस्टमध्ये कर्जाचा खुलासा केला आहे. त्यांच्या डोक्यावर 1.2 अब्ज डॉलरचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचे मते, कर्ज हाच पैसा आहे. चांगले कर्ज आणि वाईट कर्ज यावर त्याने भाष्य केले. चांगल्या कर्जामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीसाठी त्यांनी कर्ज घेण्याचा सल्ला दिला.
Rich Dad poor Dad च्या 4 कोटींहून अधिक प्रतींची विक्री
‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाने खपाचे अनेक उच्चांक गाठले. हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक ठरले. जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला. Robert Kiyosaki यांनी 1997 मध्ये हे पुस्तक लिहिले होते. तेव्हापासून ते आजगायत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या नि हातोहात विक्री झाल्या. जगातील 50 हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक छापण्यात आले आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली.