नवी दिल्ली : तुम्हाला ही ‘सोनेरी’ खेळात सहभाग होऊन ‘चांदी’ करता येईल. सोने-चांदीने (Gold Silver Price) पुन्हा आनंदवार्ता आणली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूत पडझड सुरु आहे. त्याचा खरेदीदारांना फायदा घेता येईल. दूरवर असलेल्या अमेरिकेतील घडामोडींचा हा परिपाक आहे. त्या देशात हट्टी महागाईला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. दिवाळखोरी थांबविण्यासाठी आता अमेरिकन बायडेन प्रशासन काय निर्णय घेते, हे लवकरच समोर येईल. या घडामोडींमुळे सोने-चांदीवर मोठा दबाव आला आहे. किंमतीत सातत्याने घसरणीवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूत पडझड सुरु आहे. त्याचा खरेदीदारांना फायदा घेता येईल.
दोनच दिवस वधारले भाव
गेल्या पंधरवाड्यापासून मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र सुरु आहे. चांदीतील घसरण कायम आहे. 24 मे आणि 20 मे हे दोन दिवस वगळता सोने-चांदीत पडझड सुरु आहे. अनुक्रमे प्रति 10 ग्रॅम 250-260 रुपयांची आणि 500-550 रुपयांची दरवाढ या दिवशी नोंदविण्यात आली. पण या दहा दिवसांत सोन्यात जवळपास 1800 रुपये प्रति 10 ग्रॅम पडझड झाली.
तर सोने-चांदी दबावाखाली
kitco.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील वाढती महागाई आणि आर्थिक आघाडीवरील आकडेवारी निराशाजनक आहे. त्यातच दिवाळखोरीचे मोठं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यापासून सोने-चांदी दबावाखाली आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने तिथल्या व्याजदरात 25 बेसिस अंकांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्याचा काय परिणाम होईल हे लवकरच दिसून येईल.
सोने-चांदीचा भाव काय
goodreturns नुसार आज सोन्यात सकाळच्या सत्रात प्रति 10 ग्रॅमची 10 रुपयांची घसरण झाली. काल संध्याकाळपर्यंत 150 रुपयांची घसरण झाली. शनिवारी 22 कॅरेटचा भाव 55,790 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. IBJA नुसार, शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,500 रुपये आहे.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,901रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,107 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.