प्रत्येक 5 तासानंतर अर्धा तासाचा ब्रेक, मोदी सरकार कामाचे तास 12 करण्याच्या तयारीत!

| Updated on: Jan 11, 2021 | 11:05 AM

मोदी सरकार कामाचे तास आता 9 वरुन 12 करण्याची शक्यता आहे. त्यात दर 5 तासांनंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जाणार आहे.

प्रत्येक 5 तासानंतर अर्धा तासाचा ब्रेक, मोदी सरकार कामाचे तास 12 करण्याच्या तयारीत!
Follow us on

नवी दिल्ली: 1 एप्रिल 2021 पासून तुमची ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी अर्धात पीएफ आणि कामांच्या तासांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये वाढ होणार आहे. तर हातात येणाऱ्या पगारामध्ये मात्र कपात होणार आहे. इतकच नाही तर कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे मोदी सरकार कामाचे तास आता 9 वरुन 12 करण्याची शक्यता आहे. त्यात दर 5 तासांनंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जाणार आहे.(The central government plans to increase the working hours of employees to 12 hours)

रोजगाराच्या नव्या परिभाषेनुसार मिळणारा भत्ता मूळ पगाराच्या अधिकाधिक 50 टक्के असणार आहे. याचा अर्थ मूळ वेतन एप्रिलपासून एकूण वेतनाच्या 50 टक्के किंवा अधिक असायला हवं. देशाच्या 73 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे कामगार कायद्यात बदल करण्यात येणार आहेत. सरकारच्या मते हे नवीन कामगार कायदे कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांच्या हिताचे आहेत.

वेतन घटणार, पीएफ वाढणार

केंद्र सरकारच्या नव्या बदलांनुसार मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या 50 टक्के अधिक असणं गरजेचं आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होणार आहे. कारण, कारण वेतनाचा भत्त्यांव्यतिरिक्त असलेल्या भाग हा एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असणार आहे. तर एकूण वेतनात भत्त्यांचा हिस्सा हा अधिक होणार आहे. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं तुमच्या पीएफमध्ये वाढ होणार आहे. कारण, पीएफ हा मूळ वेतनावर आधारित असतो. मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं आता तुमच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होणार आहे.

निवृत्तीच्या राशीत वाढ होणार

ग्रॅच्युटी आणि पीएफच्या रकमेत वाढ होणार असल्यानं तुमच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एकूण रकमेत वाढ होणार आहे. यामुळे लोकांना निवृत्तीनंतर सुखद जीवनाचा आनंद घेता येणार आहे. ज्यांची पगार जास्त आहे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठा बदल होणार आहे. त्यामुळे असे अधिकारी-कर्मचारी या बदलामुळे अधिक प्रभावित होणार आहेत. कंपन्यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये जास्ती योगदान द्यावं लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरही प्रभाव पडणार आहे.

कामांचे तास 12 करण्याचा प्रस्ताव

केंद्रानं नव्या कायद्यात कामांच्या तासांमध्ये वाढ करुन 12 तास करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओएसएच कोडच्या ड्राफ्ट नियमांनुसार 15 ते ३० मिनिटांमधील अतिरिक्त कामकाजला 30 मिनिटे ग्राह्य धरुन त्याचा समावेश ओव्हरटाईममध्ये केला जाणार आहे. सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी कामाला ओव्हरटाईम ग्राह्य धरला जात नाही. ड्राफ्ट नियमांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याकडून 5 तासांपेक्षा जास्त सलग काम करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रत्येक 5 तासांच्या कामानंतर अर्धा तासाची विश्रांती देणं गरजेचं असणार आहे.

संबंधित बातम्या:

LIC policy | रोज फक्त 125 रुपये भरा, मिळवा 27 लाख रुपये, सोबतच ‘हे’ मोठे फायदे

‘त्या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा नाही, शासन निर्णय जारी!

The central government plans to increase the working hours of employees to 12 hours