नवी दिल्ली : सोन्याचे भाव (Gold Rate) गेल्या दोन महिन्यात निच्चांकी स्तरावर पोहचले आहेत. सोन्यात 1950 डॉलर प्रति औसपेक्षा कमी व्यापार सुरु आहे. सोने सध्या नाही तर दोन महिन्यांपासून दबावाखाली आहे. यामागे दोन देशांतील आर्थिक घडामोडी कारणीभूत मानण्यात येतात. MetalFoucs च्या अहवालानुसार, 2023 मध्ये सोन्याच्या मागणीत 9 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. केंद्रीय बँकांनी सोन्याची खरेदी कमी केली आहे. 2022 मध्ये या बँकांनी कमाल खरेदी केली होती. सोन्याच्या किंमतीत मे महिन्यापासून मोठी दरवाढ अनुभवायला मिळालेली नाही. उलट सोन्यातील घसरण हा चर्चेचा विषय ठरला आहे. चांदीची (Silver Price) पण घसरगुंडी उडाली आहे.
मागणीत घट, पुरवठा वाढणार
सोन्याच्या मागणीत घट होत असताना, सोन्याचा मुबलक पुरवठा होईल. काही तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा पुरवठा 2 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे सरप्लस सोने 500 टनापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सोन्यामुळे सोन्याचे भाव पडतील असा कयास तुम्ही बांधत असाल तर तज्ज्ञांनी त्याला साफ नकार दिला आहे. सोन्याच्या वार्षिक किंमतीत 5 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचेल. सोन्यासाठी हे 2023 हे वर्ष लक्की ठरले आहे. आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 7 टक्के वाढ झाली आहे.
या देशातील घडामोडींचा परिणाम
सोन्याचे भाव गेल्या दोन महिन्यात निच्चांकी स्तरावर पोहचले आहेत. सोन्यात 1950 डॉलर प्रति औसपेक्षा कमी व्यापार सुरु आहे. सोने सध्या नाही तर दोन महिन्यांपासून दबावाखाली आहे. यामागे दोन देशांतील आर्थिक घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या दोन देशांमध्ये अचानक व्याजदर वाढीचा हा परिणाम मानण्यात येतो. त्यामुळे सोन्याच्या किंमती सध्या घसरलेल्या आहेत.
जागतिक बाजारातील किंमती
मेच्या मध्यापर्यंत सोन्याच्या किंमती जागतिक बाजारात 1930 ते 1980 डॉलर प्रति औस या दरम्यान होत्या. जागतिक बाजारात पण सोने घसरल्याचे हे द्योतक होते. सोन्याच्या किंमती अजून किती घसरणार याचा अंदाज नसला तरी वार्षिक आधारावर सोन्याचे भाव वाढलेले असतील.
8 दिवसांतील बदल