नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) काही पण घडू शकते. एखाद्या कंपनीची जोरदार घौडदौड सुरु असली की, त्याचा फायदा गुंतवणूकदारांना पण होतो. तर कंपनीला तोटा झाला तर त्याचा फटका पण बसतो. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येत आहे. मार्चनंतर अनेक कंपन्यांनी त्यांचे निकाल जाहीर केले आहेत. काही कंपन्यांना जोरदार कमाई करता आली तर काही कंपन्यांना तोटा झाला. पण या कंपनीने नफ्यात वाढ होताच, तो गुंतवणूकदारांमध्ये वाटप करण्याचे धोरण स्वीकारले. कंपनीने गुंतवणूकदारांना अगोदर एक लाभांश जाहीर केला. नंतर पुन्हा विशेष लाभांशाची (Dividend) घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आनंद दुप्पट झाला आहे.
Linde India चा फायदा
जर तुम्ही Linde India या कंपनीचा शेअर खरेदी केला असेल अथवा खरेदी करण्याची तयारी असले तर हा फायद्याचा सौदा ठरला आहे. कंपनीला यंदा चांगला फायदा झाला. त्यामुळे कंपनीने 12 रुपये प्रति शेअर लाभांश दिला. तसेच कंपनीने गुंतवणूकदारांना 7.50 रुपयांचा विशेष लाभांश देण्याची घोषणा केली. मंगळवारी या शेअरमध्ये घसरणीचे सत्र दिसून आले. हा शेअर बाजारात 3870 रुपयांवर ट्रेड करत होता. आज 24 मे रोजी हा शेअर 3997.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज हा शेअर 127.40 रुपयांनी वधारला.
तिमाहीत असा झाला नफा
कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. वर्ष 2021-22 च्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत वर्ष 2022-23 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्याच्या तिमाही कंपनीचा नफा 50.5 टक्क्यांनी वाढला. हा नफा या तिमाहीत 99.2 कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी कंपनीचा नफा 66 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूलात 18 टक्क्यांची वाढ होऊन हा नफा 630.2 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी या कंपनीचा महसूल 534.2 कोटी रुपये होता.
शेअर खरेदीची झुंबड
EBITDA म्हणजे सध्याचा कार्यरत नफा 41 टक्क्यांनी वधरुन 185.6 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षांपूर्वी हा नफा 131.6 कोटी रुपये होता. कंपनीचे मार्जिन 24.6 टक्क्यांहून वाढून 29.5 टक्के झाले.
Linde India शेअरची कामगिरी
एका महिन्यात हा शेअर 1 टक्क्यांनी घसरला. एका वर्षात हा शेअर 30 टक्क्यांनी वधारला आहे. तीन वर्षांतील आकडेवारीनुसार या शेअरमध्ये 700 टक्क्यांची वाढ झाली. प्रमोटर्सची हिस्सेदार वाढली आहे. ही हिस्सेदारी 75 टक्के इतकी आहे. गेल्या 5 तिमाहीत यामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या शेअरमधून माघार घेतली आहे. 2.8 टक्क्यांहून त्यांची हिस्सेदारी 2.77 टक्के इतकी उरली आहे. तर देशातील गुंतवणूकदारांचा वाटा मात्र वाढला आहे.