नवी दिल्ली : सध्या अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल (Quarter Result) हाती येत आहे. काही कंपन्यांनी नफ्यात जोरदार मुसंडी मारली तर काहींना कमालीचा तोटा सहन करावा लागला. काहींनी सरासरी गाठली, तर काहींना लाभाचे गणित जुळविता आले. पण शेअर बाजारात सध्या एका सिमेंट कंपनीची (Cement Company) जोरदार चर्चा आहे. या कंपनीला सर्व बाजीगर म्हणून ओळखत आहेत. कंपनी तोट्यात असतानाही या कंपनीने गुंतवणूकदारांवर बक्कळ पैसा लुटवला आहे. या सिमेंट कंपनीच्या नफ्यात घट आली. कंपनीला फटका बसला. पण कंपनी अशी बहाद्दर की या तोट्याची झळ गुंतवणूकदाराला बसू दिली नाही. या कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार लाभांश (Dividend) वाटप केला.
नफा घटला
तर चर्चेत असलेली ही सिमेंट कंपनी अल्ट्राटेक आहे. अल्ट्राटेक कंपनीने शुक्रवारी, 28 एप्रिल रोजी जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीचे निकाल घोषीत केले. या तिमाहीमध्ये कंपनीला फटका बसला. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 32.29% घसरण होऊन हा नफा 1,665.95 कोटी रुपयांवर आला. सिमेंट उद्योगात अल्ट्राटेकचा चांगला दबदबा आहे.
तिमाहीत महसूल वाढला
गेल्या वर्षी सारख्या तिमाहीत कंपनीने नफ्याचे शिखर गाठले होते. कंपनीला 2,460.51 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढला. एकीकडे निव्वळ नफा कमी झाला असला तरी कंपनीचा महसूल वाढला आहे. कंपनीचा महसूल 18.36% वाढून 18,662.38 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षांत याच कालावधीत कंपनीचा महसूल 15,767.28 कोटी रुपये होता.
कंपनीची आगेकूच
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने आर्थिक वर्ष FY-23 मध्ये 10 कोटी उत्पादन, विपणन आणि विक्री नोंदवली. कंपनीला 95% कॅपासिटी युटिलाईजेशन सपोर्ट मिळाला. मार्चच्या तिमाहीत कंपनीच्या कॅपासिटी युटिलाईजेशन 95% होते. गेल्या आर्थिक वर्षांत हा आकडा 84% होता.
38 रुपयांचा लाभांश
कंपनीला फटका बसला असला. नफ्यात घट झाली तरी कंपनीने गुंतवणूकदारांचा प्राधान्याने विचार केला. कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 38 रुपये दराने लाभांश देण्याचा निर्णय घेतला. 28 एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या तोट्याचा कंपनीच्या वृद्धी व विस्तार धोरणावर काहीच परिणाम झाला नाही. कंपनीने कोणताही प्रकल्प थांबविला नाही. धोरणानुसारच कंपनीचा विस्तार होणार आहे. आर्थिक वर्ष FY23 मध्ये कंपनीने सिमेंट प्लँटमध्ये 12.4 MTPA ची वृद्धी नोंदवली. कंपनीचा बिहार मधील पाटलीपूत्र ब्राऊनफील्ड सिमेंट प्लँट आहे. एप्रिल 2023 मध्ये या प्रकल्पाची क्षमता 2.2 MTPA ने वाढली.