सोन्याच्या किंमती रेकॉर्डब्रेक घसरण झालेली आहे. त्यामुळे दुबईवारी करुन तेथील स्वस्तातील सोने भारतात आणण्याचे फॅड आता कमी होऊ शकते असे म्हटले जात आहे. युएईमध्ये ज्वेलर्स असलेल्या एका भारतीय व्यावसायिकाने इकॉनॉमिक्स टाईम्सशी बोलताना नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात कस्टम ड्यूटी कमी केल्याने दुबईत स्वस्तातील सोने खरेदी करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत घसरण होणार असल्याचा दावा केला आहे.
जुलै 2022 रोजी भारतात सीमा शुल्कात प्रचंड वाढ झाल्यानंतर युएईला फिरायला जाणाऱ्या भारतीयांना तेथून येताना सोबत सोने आणण्याचा प्रघात पडला होता. आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात सोन्याच्या धातूवरील आयात शुक्ल जवळपास निम्म्याने कमी केले आहे. कस्टम ड्यूटी घटविल्याने परदेशात सोने खरेदी करण्याची काही गरज नाही असे एका सोने व्यापाऱ्याने इकॉनॉमिक्सशी बोलताना सांगितले आहे.
आमच्या युएईमधील 50 टक्के सोने खरेदीचे व्यवहार भारतात ट्रान्सफर होतील कारण सोने खरेदी करण्यासाठी त्यांना दुबईला जाण्याची काही गरज रहाणार नाही.ते भारतातच स्वस्त सोने खरेदी करतील असे जॉय अलुक्कास ग्रुपचे चेअरमन जॉय अलुक्कास यांनी सांगितले. भारतात तयार झालेले दागिने, विशेषत: कोलकातात तयार झालेले सोन्याचे दागिन्यांना कोलकाती आभूषण म्हटले जाते. दुबईतील सोने खरेदी भारतीय पर्यटक आणि इतर भागातून आलेल्या पर्यटकांची दुबईत सोने खरेदीसाठी मोठी झुंबड असते. परंतू भारतात सोने पाच हजाराहून अधिक रुपयांनी कमी झालेले आहे. सोन्याच्या कारागिरांना अवजड आणि हलक्या दागिन्यात नवी डिझाईन लॉन्च करण्या्स मदत होणार आहे. त्यामुळे ग्राहक भारताच्या सोने खरेदीला प्राधान्य देतील असे म्हटले जात आहे.
सीमा शुल्कात 6% की कपात म्हणजे दुबईतील सोने खरेदीवर लागू असलेल्या पाच टक्के वॅटची भरपाई करण्यास पुरेसी नाही. विदेशात भारताच्या तुलनेत सोने स्वस्त आहे ही केवळ मानसिकता आहे.आता असे राहीलेले नाही. एकदा का तुम्ही दुबईला गेला तर तुम्ही सोन्याचा एक तुकडा विकत घेता. कारण तुमच्या जवळ काही पर्यायच नसतो असे यूएईमधील भारतीय व्यापारी आणि वांद्रे येथील पॉपली एंड सन्स चे संचालक राजीव पॉपली यांनी सांगितले. भारत आणि दुबईतील सोन्याच्या दरात एक टक्के जरी भाव कमी झाला असेल तरी भारतीय ज्वेलर्स आपले ग्राहक तूटू नये म्हणून आणखी सवलत देतील असे राजीव यांनी म्हटले आहे. जर खूप जास्त सोन्याची खरेदी झाली तर ग्राहकांनी खुश करण्यासाठी भारतीय ज्वेलर्स थोडे नुकसान सोसून जरा आणखी सवलत जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले.