Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत. पण त्या भडकल्या नाहीत. पण जागतिक बाजारातील घडामोडी देशातील बाजारावर परिणाम करतातच, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ तर झाली नाही ना?
Ad
भाव एका SMS वर
Follow us on
नवी दिल्ली :कच्चा तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढल्या आहेत. पण त्या भडकल्या नाहीत. पण जागतिक बाजारातील घडामोडी देशातील बाजारावर परिणाम करतातच. बँकिंग क्षेत्रातील घडामोडी यासाठी कारणीभूत आहेत. युरोपसह अमेरिकेतील बँकांना बुडतीचा रोग जडला आहे. टॉप-20 मधील बँका धडाधडा कोसळल्या आहेत. तर दुसरीकडे रशियाने कच्चा तेलाचं उत्पादन घटवलं आहे. तुर्कीने एक प्लँटमधून तेल उत्पादन थांबवले आहे. तर इतर घटनांचाही परिणाम तेल उत्पादनावर झाला आहे. परिणामी कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 3 डॉलरची वाढ होऊन ते 72.75 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 2 डॉलरची वाढ झाली, आज हा भाव 77.93 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. त्याचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) वाढ तर झाली नाही ना?
दरवाढीला कारणीभूत कोण?
रशियाने कच्चा तेलाचं उत्पादन घटवलं आहे. तुर्कीने एक प्लँटमधून तेल उत्पादन थांबवले आहे. तर इतर घटनांचाही परिणाम तेल उत्पादनावर झाला आहे. परिणामी कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ दिसून येत आहे. तर कोविड नियम शिथिल केल्यानंतर चीनने कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2023 मध्ये आतापर्यंत चीनच्या कच्चा तेलाच्या मागणीत 6.2 टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्यावर्षी चीनमध्ये 540 दशलक्ष टन कच्चा तेलाची आयात करण्यात आली होती.