मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : 2000 रुपयांच्या नोटांना बॅंकेत जमा करण्याची किंवा त्या बदलून घेण्याची वाढविलेली मुदत उद्या 7 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही जर या नोटा असतील तुम्हाला शेजारील कोणत्याही बॅंकेत जाऊन त्या बदल्याची शेवटची संधी आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की 96 टक्क्यांहून अधिक 2 हजार रुपयांच्या नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. त्याची किंमत 3.43 लाख कोटी आहे. परत आलेल्या नोटांमध्ये 87 टक्के नोटा बॅंकेत जमा झाल्या तर उर्वरित नोटा बदलण्यात आल्या. तरीही बाजारात अजूनही 12 हजार कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा चलनात आहेत.
दोन हजार रुपयांच्या नोटांना चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यानंतर 30 सप्टेंबर दोन हजाराची नोट बदलण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आरबीआयने ही मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढविली. आता बॅंकेत नोटा जमा करण्याची डेडलाईन संपल्यानंतर दोन हजाराच्या नोटा थेट आरबीआयच्या कार्यालयात जमा करता येणार आहेत. एका वेळी 20 हजार रुपयांच्या 2000 हजाराच्या नोटा बदलता येतील. तसेच त्यांना जर आपल्या बॅंक खात्यात क्रेडीट करायच्या असतील तर 2000 च्या किती नोटा आरबीआयमध्ये जमा करु शकता.
2000 ची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये मार्केटमध्ये आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 रु.आणि 1000 रु. नोटांबर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर 500 रुपयांच्या आणि 2000 च्या नव्या नोटा बाजारात आल्या. परंतू आरबीआयने साल 2018-19 पासून 2000 नोटांची छपाई बंद केली आहे. तर 2021-22 मध्ये 38 कोटी किंमतीच्या 2000 च्या नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या.
कोणत्याही कागदपत्रांशिवाय बॅंकेत नोटा बदलता येतील. एकावेळी 20,000 रु.पर्यंत दोन हजाराच्या नोटा बदलता येतील. किंवा दुसऱ्या चलनातील नोटामध्ये बदलता येतील. तर खात्यावर पैसे जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाही. जर बॅंकेत खाते नसले तरी एकावेळी 20 हजारापर्यंत दोन हजाराच्या नोटा बदलता येतील. किंवा दुसऱ्या चलनाच्या दरात बदलून घेता येतील.