नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात नरमाई आहे. भाव झरझर घसरले. गेल्या एक महिन्यांपासून कच्चा तेलााने 88 डॉलर प्रति बॅरलपर्यंत उसळी घेतली होती. ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याची घोषणा केल्याने किंमती भडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली. पण आता मेचा दुसरा आठवडा संपत येत असताना किंमती मात्र आटोक्यात आहेत. ओपेक देशांच्या निर्णयाचा परिणाम कधी दिसणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. देशात सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) जाहीर केला. राज्यातील सर्वच शहरात आज भाव वधारलेला आहे. कोणत्याच शहरातील नागरिकांना दिलासा नाही. तुमच्या शहरात इंधन महागले की स्वस्त झाले, जाणून घ्या.
कच्चा तेलात घसरण
आज 9 मे रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 0.27 टक्क्यांनी घसरुन हा भाव 72.96 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 0.31 टक्क्यांनी कमी झाले. भाव 76.77 डॉलर प्रति बॅरल झाले.
एक लिटरवर कराचे गणित
एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 1 मे रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतील.
अशी झाली कमाई
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)