नवी दिल्ली : राज्यात राजकीय घमासान सुरु असताना सोने-चांदीत (Gold Silver Price Today) पण चढउतार सुरु आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत चढउतार दिसून आला. मे, जून महिन्यात दोन्ही धातूंनी रिव्हर्स गिअर टाकला. त्याचा मोठा फायदा ग्राहकांना झाला. गेल्यावर्षी दिवाळीनंतर सोने-चांदीचे भाव वाढत होते. 5 फेब्रुवारी रोजी दोन्ही धातूंनी रेकॉर्ड केला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही किंमतींनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. पण मे पासून सोने-चांदीची घसरगुंडी सुरु झाली. आता सोने 58,000 रुपयांच्या पण खाली उतरते की काय, असे चित्र आहे. दोन महिन्यात दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठलेला नाही. चांदी 70 हजारांच्या आसपास खेळत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला किंमतीत मोठा धमाका झालेला नाही. त्यामुळे ग्राहकांना गुंतवणुकीची मोठी संधी आहे.
चार दिवसांत दोनदा वाढ
जुलै महिन्याचा सोन्यात दोनदा वाढ झाली आहे. तर एकदा भाव घसरला आहे. 1 जून रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली. 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले. तर 3 जून रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. महिन्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोने 320 रुपयांनी वधारले. सोमवारी, 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी उतरले. भाव प्रति 10 ग्रॅम 59,120 रुपये झाला. मंगळवारी हा भाव 59,220 रुपये होता. गुडरिटर्न्सनुसार या किंमती आहेत.
जून महिन्यात काय होता भाव
गुडरिटर्न्सनुसार,जून महिन्यात पण सोन्याने दिलासा दिला. 1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 15 जून रोजी सोन्यात स्वस्ताई आली. सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त झाले. भाव 59,820 रुपयांपर्यंत उतरले. 29 जून रोजी घसरण झाली. भाव 58,900 रुपयांवर आले. तर 30 जून रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 59,000 रुपयांवर पोहचले.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
4 जुलै रोजी सोन्यात तेजी दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,522 रुपये, 23 कॅरेट 58,288 रुपये, 22 कॅरेट सोने 53,606 रुपये, 18 कॅरेट 43,892 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
गेल्या 6 वर्षांत इतकी घसरण
सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.
मे-जूनमध्ये घसरण
सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.