नवी दिल्ली : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात…आता DLF या रिअल इस्टेट कंपनीचे प्रमुख अब्जाधीश के.पी.सिंह वयाच्या 91 व्या वर्षी पुन्हा लग्न केले आहे. के.पी.सिंह ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनूसार जगातील 299 वे श्रीमंत व्यक्ती आहेत. केपींची एकूण संपत्ती 7.63 अब्ज डॉलर इतकी आहे.ना उम्र की सीमा हो ना प्यार का हो बंधन अशी जगजीत सिंह यांची गझल तुम्ही ऐकली असेल अशीच काही अवस्था उद्योगपती के.पी.सिंह यांची झाली आहे. डीएलएफ एमेरिटस चेअरमन कुशाल पाल सिंह यांना 91व्या वर्षी प्रेम झाले आहे.
डीएलएफ ही जगातील सर्वात मोठी रियल इस्टेट कंपनी असून जगात अनेक ठिकाणी कंपनीचे प्रकल्प सुरू आहेत. के.पी.सिंह यांच्या पत्नी इंदिरा यांचे साल 2018 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर ते स्व:ताला एकाकी समजत होते. सीएनबीसी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी दिली. त्यांनी म्हटले की माझी पत्नीने निधनापूर्वी सहा महिन्यांआधी माझ्याकडून कधीही हार न मानण्याची शपथ घेतली होती. माझ्याकडे पुढे जाण्यासाठी एक नवे आयुष्ये आहे.
के.पी.सिंह पुढे म्हणाले की माझ्या पत्नीची इच्छा होती की मी कधीच हार मानू नये, तिचे हेच शब्द माझ्यासोबत आहेत. मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत विस्तृतपणे बोलताना त्यांनी सांगितले की माझे आयुष्य खूपच शानदार होते. माझी पत्नी माझी पार्टनरच नव्हती तर माझी चांगली मैत्रीण होती. आमची छान ट्युनिंग देखील छान होती आजीवन सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न होता तो अधुराचा राहीला.
पार्टनरमुळे एनर्जी मिळते…
65 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेव्हा आपण आपला साथीदार गमावतो. तेव्हा आपण उदास होतो. कंपनी चालविण्यासाठी सकारत्मकता आणि सक्रीय राहणे गरजेचे आहे. जेव्हा प्रिय व्यक्तीला आपण गमावतो तेव्हा परिस्थिती बदलून जाते. जेव्हा एकटेच जीवन कंठावे लागते तेव्हा वाईट वाटते असे के.पी. सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की आता मी भाग्यशाली आहे की नवीन पार्टनर मिळाली आहे. तिचे नाव शीना आहे. ती माझ्या जीवनातील चांगल्या लोकांपैकी एक आहे. ती खूपच ऊर्जावान आहे. ती माझा शब्द खाली टाकत नाही, मला तिच्याकडून प्रेरणा मिळते.
63200 कोटींचे मालक
के.पी. सिंग हे रिअल इस्टेटमधील अब्जाधीशांपैकी एक आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, के.पी. सिंग हे जगातील 299 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. के.पी. सिंग यांची एकूण संपत्ती 7.63 अब्ज डॉलर (सुमारे 63200 कोटी रुपये) आहे. 1961 मध्ये त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली आणि त्यांच्या सासऱ्यांनी सुरू केलेल्या डीएलएफ कंपनीत ते सामील झाले. पाच दशकांहून अधिक काळ ते कंपनीचे अध्यक्ष राहिले. जून 2020 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता DLF एमेरिटसचे अध्यक्ष आहेत.