नवी दिल्ली : अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) धोरणात्मक निर्णयानंतर आता डॉलरची मजबुतीकडे वाटचाल सुरु झाली. डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा झाली नसली तरी तो स्थिर आहे. त्याचा फायदा सोने आणि चांदीला मिळाला. गुंतवणूकदारांना नफा कमविता आला. आता डॉलर अधिक मजबूत झाल्यास त्याचा सोन्याच्या चांदीच्या किंमतींवर (Gold Silver Price Today) मोठा परिणाम दिसून येईल. दोन्ही धातूंचे भाव घसरु शकतात. सध्या वायदे बाजारात एप्रिल फ्युचरसाठी सोन्याचा 59,310 रुपये प्रति तोळा भाव ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात 0.58 टक्क्यांची घसरण झाली आहे. आज शनिवारी आणि रविवार इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड दोन दिवस भाव जाहीर करणार नाही. ही संस्था देशात 1919 पासून भाव जाहीर करते.
काल, इंडियन बुलियन्स आणि ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जाहीर केल्यानुसार, शुद्ध सोन्याचा भाव संध्याकाळी 59,653 रुपये प्रति तोळा होता. तर 22 कॅरेट सोने 59,414 रुपये तोळा होते. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव अगदीच कमी म्हणजे अवघा 34,897 रुपये प्रति तोळा होता. तर शुद्ध चांदीचा भाव प्रति किलो 69,756 रुपये होता.
भावात पुन्हा वाढ
आज 25 मार्च रोजी, सकाळी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भाव वधारले. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ होऊन भाव 55,150 रुपयांवर पोहचला. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 220 रुपयांची वाढ झाली. हा भाव सकाळच्या सत्रात 60,150 रुपये होता. चांदीचे भाव पण वधारले आहेत. आज चांदीत 400 रुपयांची वाढ झाली. एका किलो चांदीचा भाव आज 73,000 रुपये होता.
चांदी रेकॉर्डच्या जवळ
1 फेब्रुवारी रोजी चांदी 73,300 रुपये किलो होती. त्यानंतर . 2 फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये होता. आज, 25 मार्च रोजी सकाळच्या सत्रात एका किलो चांदीचा भाव 73,000 रुपये होता. आज यापूर्वीचा रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहे. चांदी सूसाट असल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे.
हॉलमार्कची पद्धत