Marathi News Business The impact of developments in America is being seen in the international market. Crude oil is no exception. Crude oil prices are constantly fluctuating. Will rising petrol diesel prices comfort you
Petrol Diesel Price Today : महागाईत मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचा भाव होणार कमी?
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. कच्चा तेलाही त्यापासून अलिप्त नाही. कच्चा तेलाच्या भावात सातत्याने चढउतार होत आहे. महागाईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती तुम्हाला दिलासा देतील का
Ad
Follow us on
नवी दिल्ली : अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहे. अमेरिकेच्या दोन मोठ्या बँकांना ताळे लागले आहे. तर तिसरी बँक रांगेत आहे. एवढेच नाही तर महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक वाढीव व्याज दर लादणार आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येत आहे. त्यात कच्चा तेलाचाही समावेश आहे. कच्चा तेलाच्या भावात (Crude Oil Price) सातत्याने चढउतार होत आहे. भारताने अमेरिकेकडून आयात होणाऱ्या कच्चा तेलात कपात केली आहे. रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल, तेही स्वस्तात आयात करण्यात येत आहे. त्याचा फायदा भारताला होत आहे. आता नागरिकांना या बदलत्या किंमतींचा कधी फायदा मिळतो, हे लवकरच समोर येईल. पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) कमी होण्याची नागरिकांची मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज, 16 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 68.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 74.91 डॉलर प्रति बॅरल आहे. आज, या किंमतींच्या आधारे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.