नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून गौतम अदानी (Gautam Adani) आणि त्यांचा अदानी समूह (Adani Group) मीडियात सातत्याने चर्चेत आहे. या समूहाच्या उदयापासून ते पडझडीच्या अनेक बातम्या तुम्ही या दीड महिन्यात वाचल्या असतील. तर त्यापूर्वी अदानी कसे झपाट्याने जगातील श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले, त्यांनी दुसऱ्या क्रमांकापर्यंत कशी झेप घेतली हे कौडकौतूकही तुम्ही वाचले असेल. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाची पडझड आणि झपझप कोसळलेल्या त्यांच्या शेअर्सची माहिती ही तुम्ही वाचली असेल. त्यानंतर आता काही स्टॉकला अप्पर सर्किट लागल्याची बातमी येऊन धडकली आहे. या सर्व घडामोडीत गौतम अदानी यांनी एक नवीन कंपनी (New Company) स्थापन केली आहे. या कंपनीचे काम काय? ती कशासाठी स्थापन केली, तिचे औरंगाबाद कनेक्शन (Aurangabad Connection) काय? हे पाहुयात..
अदानी ट्रान्समिशन ही अदानी समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. या कंपनीने ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. म्हणजे अदानी ट्रान्समिशनची उपकंपनी अस्तित्वात आली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) असे या कंपनीचे नाव आहे. अदानी ट्रान्समिशनने या घडामोडींविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, अदानी ट्रान्समिशनने संपूर्ण स्वतंत्र असलेली आणि सहाय असलेली कंपनी स्थापन केली आहे. 15 मार्च 2023 रोजी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अर्थात कंपनीने अद्याप व्यावसायिक सुरुवात केलेली नाही.
काय आहे प्लॅन
अदानी इलेक्ट्रिसिटी औरंगाबाद लिमिटेड ( AEAL) या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. अदानी ट्रान्समिशनने ही कंपनी स्थापन केली आहे. औरंगाबादमध्ये समांतर वितरण परवाना लागू करण्यासाठी या कंपनीची मदत होणार आहे. अजून या कंपनीचे एकूण कार्य आणि तिचा उद्देश स्पष्ट करण्यात आला नाही. तसेच या कंपनीचे काम कसे चालेल, याची माहिती देण्यात आलेली नाही. या कंपनीचे कार्यालय कुठे आहे. तिचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शेअर्सची अवस्था काय