नवी दिल्ली | 1 March 2024 : ” मला तर बिलकूल माहिती नव्हतं. मला वाटलं कोणी परदेशी पाहुणा आहे, त्याला चहा द्यायला, हवा तर त्याला चहा तयार करुन दिला. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी हैदराबादहून नागपूरला आलो, तेव्हा कळले की, अरे डॉली तू काय सिक्सर ठोकलाय!” सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेले आणि आपल्या चहा तयार करण्याच्या स्टाईलने लोकप्रिय झालेल्या डॉली चहावाल्याचे हे शब्द आहेत. बिल गेट्स या अब्जाधीशाला आणि प्रसिद्ध उद्योगपतीला आपण चहा तयार करुन पाजल्याचे त्या बिचाऱ्याच्या गावी पण नव्हते. पण त्याच्या आयुष्यात एक इतिहास घडला.
स्टाईलशी चहावाला
सोशल मीडिया स्टार आणि स्टाईलिश चहावाला डॉली, हा रस्त्याच्या बाजूला एक टपरीवजा ठेला लावून चहा तयार करतो. पण तो सोशल मीडियावर पण लोकप्रिय आहे. अनेक दूरदूरच्या काँन्टेंट क्रिएटर्सने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. एका कार्यक्रमात डॉलेनी त्याच्या खास स्टाईलमध्ये चहा करुन जगप्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना पाजला. पण डॉली बिल गेट्स यांना ओळखूच शकला नाही. बिल गेट्सने त्याचा चहा पिऊन, दिलखुलास दाद दिली. वाह! काय चहा आहे, अशी कौतुकाची थाप दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाजायचा चहा
बिल गेट्सची तब्येत आपल्या चहाने खुश करणाऱ्या डॉलीला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा पाजायचा आहे. बिल गेट्स यांना चहा पाजल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच्या हटके अंदाजासह तो जणू चहामध्ये लज्जत ओततो. सोशल मीडियावर चहा तयार करण्याचे त्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे.
बिल गेट्स यांनी पोस्ट केला व्हिडिओ
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बिल गेट्स डॉली याला एक चहा देण्यास सांगतात. त्यानंतर डॉली त्याच्या खास शैलीत चहा तयार करतो. तो दूध, दुरुनच चहात ओततो, इतर मसाले सुद्धा दुरुनच पण अचूक पणे चहाच्या भांड्यात टाकतो. त्याची हेअरस्टाईल, डोळ्यावरचा चष्मा आणि हटके स्टाईल पाहण्यासाठी पण अनेक जण त्याच्या टपरीवर एक कट पिण्यासाठी येतात.