Neville Tata : टाटा यांच्या या वारसदाराकडे काय जबाबदारी, कोण आहेत नेविल टाटा

| Updated on: Aug 31, 2023 | 6:10 PM

Neville Tata : गेल्या वर्षी टाटा समूहाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. टाटाच्या पुढच्या पिढीला तयार करण्यासाठी, त्यांच्या अनुभवाचा फायदा उचलण्यासाठी त्यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या मंडळावर घेण्यात आले होते. यामध्ये लिआ, माया आणि नेविल यांचे नाव आहे. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी ही नियुक्ती करण्यात आली होती.

Neville Tata : टाटा यांच्या या वारसदाराकडे काय जबाबदारी, कोण आहेत नेविल टाटा
Follow us on

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : टाटा समूह (Tata Group) हा देशातील सर्वात मौल्यवान समूहापैकी एक आहे. देशासाठी या समूहाने अनेकदा त्यागच नाही तर मदत केली आहे. या समूहात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. रतन टाटा (Ratan Tata) यांच्याविषयी तर देशाला मोठा अभिमान आहे. त्यांची दूरदृष्टी, देशाच्या विकासात त्यांचे योगदान, नम्रपणा अशा अनेक गुणांमुळे अनेक जण त्यांना आदर्श मानतात. आता टाटा समूहाची पुढची पिढी पण मैदानात उतरली आहे. हे तरुण वारसदार केवळ वारसाच्या जोरावर पुढे आले नाही तर त्यांनी त्यासाठी मेहनत पण घेतली. या तरुण तडफदार वारसांच्या अनुभवाचा फायदा उचलण्यासाठी त्यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या मंडळावर घेण्यात आले आहे. यातील नेविल नवल टाटा (Neville Naval Tata) कोण आहे, याची अनेकांना उत्सुकता आहे.

कोण आहेत नेविल टाटा

नेविल टाटा हे एक वारसच नाही तर तरुण उद्योजक पण आहेत. ते थेट टाटा यांच्या घराण्यातील आहे. ते नवल टाटा यांचे चिरंजीव आहेत. त्या नात्याने ते रतन टाटा यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांची टाटा समूहात हिस्सेदारी आहे. ते टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या मंडळाचे सदस्य आहेत. टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहिण आलू मिस्त्री ही त्यांची आई आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे झाले शिक्षण

नोएल टाटा यांची तीन मुलं आहेत. त्यात नेविल टाटा सर्वात लहान आहे. त्यांचे शिक्षण बेयस बिझनेस स्कूलमध्ये झाले आहे. त्यांचे लग्न मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झाले आहे. मानसी, किर्लोस्कर टेक्नॉलॉजीजची संचालक आहे. त्यांचा एक मुलगा आहे, ज्याचे नाव जमसेत टाटा आहे.

ही आहे जबाबदारी

नेविल सध्या रिटेल चेन ट्रेंट लिमिटेडशी जोडल्या गेले आहेत. या कंपनीची स्थापना त्यांची आजी सिमोन टाटा यांनी केली होती. नेविल फॅशन रिटेल ब्रँड जुडिओ स्टोर्सचे व्यवस्थापन करतात. या ब्रँडची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. ट्रेंटमध्ये नेविल हायपरलोकल फूडचे व्यवस्थापन पाहतात. ही कंपनी वेस्टसाईड, स्टार बाजार आणि लँडमार्क स्टोअरचे व्यवस्थापन करते. लँडमार्क स्टोअरचे टेस्कोसह जाईंट व्हेंचर आहे.

आजी पण उद्योजिका

रतन टाटा यांच्या काळात टाटाने अनेक क्षेत्रात उद्योग उभारणी केली. त्यांच्या परंपरागत उद्योगांनी मोठी उभारी घेतली. तर नवीन कंपन्यांनी पण व्यवसायात मोठा जम बसवला. रतन टाटा यांची सावत्र आई सिमोन टाटा यांनी कॉस्मेटिक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली. त्या या कॉस्मेटिक कंपनी लक्मेच्या चेअरवुमन होत्या. नेविल टाटा हे त्यांचे नातू आहेत.