Petrol Diesel Price Today : महागाईच्या आगीत कच्चा तेलाने उडी घेतली आहे. कच्चा तेलाचा भाव कमालीचा वधारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भाव घसरणीवर होते. पण आज भाव 80 डॉलरच्या जवळपास गेले. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
Ad
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली :कच्चा तेलाने(Crude Oil) महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रातील अस्थिरता याला कारणीभूत ठरत आहे. तसेच चीनने मागणी वाढवल्याने त्याचा फटका बसत आहे. त्यातच रशियाने मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने त्यांचा एक प्लॅँट तात्पुरता बंद ठेवला आहे. बँकिग सेक्टरमधील घडामोडींचा मोठा परिणाम डॉलर, सोने-चांदी, शेअर बाजार आणि कच्चा तेलावर होत आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचा भाव कमालीचा वधारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भाव घसरणीवर होते. पण आज भाव 80 डॉलरच्या जवळपास गेले. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? आज टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price Today) जरुर तपासा.
कच्चा तेलाची भरारी
आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 4डॉलरची वाढ होऊन ते 73.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 3 डॉलरची वाढ झाली, आज हा भाव 79.06 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. त्याचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) वाढ तर झाली नाही ना?