Gold Silver Rate Today | आज रविवारी, 24 जुलै 2022 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Silver rate today) 51,600 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 46900 प्रति 10 ग्रॅम आहे. तर गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 55,100 रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रचंड घसरले आहे आणि देशांतर्गत किंमतीत ही घसरण पहायला असे संकेत असले तरी दरात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती सातत्याने पडत आहेत. डॉलर इंडेक्स (Dollar Index) मजबूत झाल्याने हा प्रभाव दिसून येत आहे. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाईचा दबाव ही सोन्यावर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव सातत्याने घसरत आहेत. पण भारतीय बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर वधरले आहेत. शुक्रवारी, जागतिक बाजारात सोन्याने सहा आठवड्यांतील पहिली साप्ताहिक वाढ यशस्वीपणे नोंदवली. डॉलर घसरल्याने आणि अमेरिकेच्या गंगाजळीत उत्पन्न कमी झाल्यामुळे चालू आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने हे गुंतवणुकीसाठी (Investment) सुरक्षित साधन मानण्यात येते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार(Good Return Website) मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,600 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,900 रुपये आहे. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे. नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे तर प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 46,930 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रुपये आहे. तर चांदीचा भाव प्रति 10 ग्रॅम 551 रुपये होता.
शुक्रवारी, जागतिक बाजारात सोन्याने सहा आठवड्यांतील पहिली साप्ताहिक वाढ यशस्वीपणे नोंदवली. डॉलर घसरल्याने आणि अमेरिकेच्या गंगाजळीत उत्पन्न कमी झाल्यामुळे चालू आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित साधन मानण्यात येते. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून 1,721.29 डॉलर प्रति औंस झाले. रॉयटर्सच्या अहवालानुसार, गुरुवारी स्पॉट गोल्ड 1,680.25 डॉलरवर गेला एका वर्षाच्या नीचांकी स्तरावरुन पुढे सरकले.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.