Gold Silver Price Today News | भारतीय सराफा बाजारात (Sarafa Bazar) शुक्रवारी सोन्याच्या भावात (Gold Price Today) वाढ झाली तर चांदी स्वस्त झाली . सोन्याच्या भावात वाढ नोंदवण्यात आली असली तरी चांदी मात्र स्वस्त झाली आहे. 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 52,140 रुपयांना उपलब्ध आहे, तर 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 57,838 रुपये झाली आहे. दिवसातून दोन वेळा सोन्या-चांदीचे दर जाहीर होतात. एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ibjarates.com 995 शुद्धतेसह 10 ग्रॅम सोने आज 51,931 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 916 शुद्धता असलेले सोने 47,760 रुपयांना मिळत आहे. याशिवाय 750 शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 39,105 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 585 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव आज 30,502 रुपये झाला आहे. 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव (Silver Rate Today) आज 57,838 रुपये होता.
सोन्या-चांदीच्या दराबाबत रोज बदल होतात. आज 999 शुद्धता असलेले सोने 101 रुपयांनी महाग झाले आहे. 995 शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला. याशिवाय 916 शुद्धतेचे सोने आज 92 रुपयांनी महाग झाले. त्याचबरोबर 750 शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात आज 76 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय 585 शुद्धता असलेले सोने आज 59 रुपयांनी महाग झाले. तर एक किलो चांदी आज 219 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,500 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,830 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये इतका असेल. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,530 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 577 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.