नवी दिल्ली : महागाईने (Inflation) पाकिस्ताननंतर भारतावर अधिक्रमण केले आहे. गेल्या दोन महिन्यात सोने-चांदीत दरवाढ न होता, इतर सर्वच वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाने तर शंभरी पार केली आहे. आता भाजीपालाच नाही तर डाळींनी पण असहकार पुकारला आहे. टोमॅटो 160 रुपये किलोच्या पुढे विक्री होईल हा कोणी विचार तरी केला होता का? कांदा, आलू, अद्रक, मिरची आणि ही यादी वाढतच चालली आहे. नवनवीन खेळाडू या यादीत दाखल होत आहे. येथे पक्षांतर बंदी कायदा लागू नाही. आता या यादीत डाळींनी वरचा क्रमांक लागणार आहे. डाळीच्या किंमती (Pulses Price) भडकणार आहेत. महागाईने जनता अगोदरच होरपळली आहे. आता त्यांचं जगणं अवघड होणार आहे.
डाळी महागणार
लहरी निसर्गाचा मोठा फटका गेल्या वर्षांपासून मानव जातीला बसत आहे. तापमान वाढीमुळे, वायू उत्सर्जनामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. त्याचा परिणाम अवकाळी पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही भागात पावसाने थांबाच न घेतल्याने पीकांच्या उत्पादनावर परिणाम झाला. पेरणीत 31 ते 60 टक्के कमतरता आली आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह इतर धान्याच्या किंमती दुहेरी शतक मारण्याच्या तयारीत आहेत.
यामुळे बसेल फटका
पेरण्या रखडल्या
देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तरीही खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. शेतात चिखलच चिखल झाल्याने शेतकऱ्यांना कामास अडचणी येत आहे. तर काही ठिकाणी शेतात अजूनही पाणी साचलेले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या याच कालावधीत गेल्यावर्षीपेक्षा 8.6 टक्के एकरावरच पेरणीचे चित्र आहे. काही भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे. देशात 101 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. शुक्रवारपर्यंत 35.34 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पीकांसाठी योग्य पावसाची गरज आहे.
तूर चिंतातूर
तूरीच्या डाळीने चिंता वाढवली आहे. ही डाळ दररोज वापरात येते. यंदा तूरीच्या पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ 0.6 दशलक्ष हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. तर गेल्यावर्षी 1.5 दशलक्ष हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.
उडीद ही कमी
उडीदाची पेरणी यावेळी केवळ 0.48 दशलक्ष हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा हे प्रमाण 31.43 टक्क्यांनी घसरले आहे. भातशेतीवर पण परिणाम झाला आहे. पंजाब वगळता, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने डाळी आणि तांदळाच्या पेरण्यांवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत निसर्गाचा चमत्कार दिसला नाही तर महागाईचा मार बसेल.
किंमतीत इतकी उसळी