नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीच्या शेवटी अदानी समूहाला जबरदस्त हादरा बसला. त्यातून हा समूह अजून सावरलेला नाही. अमेरिकन संशोधन संस्था आणि शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहात त्सुनामी आली. या समूहातील कंपन्यांचे शेअर धडाधड जमिनीवर आलेत. त्यांच्या किंमतीत 90 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर धडाधड कोसळल्याने बाजारातही भीतीचे वातावरण पसरले. शेअर बाजाराला त्याचा तडाखा सहन करावा लागला. पण नंतर बाजार सावरला. पण अदानींच्या कंपन्या अजूनही गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करु शकलेल्या नाहीत. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील बँकांना अदानी समूहाविषयी नवीन निर्देश दिले आहेत. त्यामुळे संकटांची मालिका अजूनही खंडीत झालेली नाही.
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमधील पडझड थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी या समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये नीच्चांकी सर्किट दिसले. शेअरच्या किंमती घसरल्याने गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत सर्वात मागे फेकले गेले. काही महिन्यांपूर्वी जगातील अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अंबानी यांना जोरदार झटका बसला.
जगातील श्रीमंतांच्या यादीत अदानी आता Top-30 मध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलरहून कमी आली आहे. जानेवारीच्या शेवटी अदानी समूहाला जबरदस्त हादरा बसला. त्यातून हा समूह अजून सावरलेला नाही. अदानींवरील संकटांची मालिका अजूनही खंडीत झालेली नाही. आता अदानी समूहाला विविध बँकांनी दिलेले कर्ज आरबीआयच्या रडारवर आले आहे. या कर्जाची समीक्षा करण्याचे निर्देश केंद्रीय बँकेने दिले आहे. दर आठवड्याला या कर्जासंबंधीचा आढावा घेण्यात येणार आहे.
अदानी ग्रुपला देण्यात आलेल्या कर्जाविषयीची अद्ययावत माहिती दर आठवड्याला देण्याचे निर्देश RBI ने संबंधित बँकांना दिले आहे. भारतीय बँकांनी अदानी समूहाला जवळपास 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या समूहावर एकूण जेवढे कर्ज आहे. त्यापैकी 40 टक्के कर्ज बँकांनी दिले आहे. आता या सर्व कर्जाचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे.
जागतिक रेटिंग संस्था S&P ने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाविषयी चांगले संकेत दिले आहे. या संस्थेने कर्ज पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. एका वृत्तानुसार, अदानी समूह जवळपास 40 कोटी डॉलरच्या परदेशी कर्जासाठी काही एजन्सींसोबत बोलणी करत आहे. ऑस्ट्रेलियात अदानी समूहाचा कोल पोर्ट आहे. या कोल पोर्टवर हे कर्ज घेण्यात येणार आहे.