नवी दिल्ली : अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार, 22 एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी ही शुभ मानण्यात येते. त्यामुळे यादिवशी खरेदी केलेले सोने हे अक्षय असते, त्यामुळे घरात सुख आणि शांती येते, अशी मान्यता आहे. भारतीयांचं सुवर्णप्रेम सर्वांनाच माहिती आहे. चीन नंतर भारतात सोन्याची सर्वाधिक आयात करण्यात येते. सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) फायदेशीर ठरली आहे. सोन्याने इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सर्वाधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार काही वर्षांतच मालामाल झाले आहेत.
इतर पर्याय फेल
शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकेतील एफडी आणि इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सोन्याने सर्वाधिक परतावा दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओतील सोन्याची गुंतवणूक फायदेशीर तर ठरेलच पण स्थिर उत्पन्नाचा हा स्त्रोतही ठरेल. यावेळी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार सुरु आहे. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता असणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2023 मधील एका रिसर्चनुसार, अस्थिरत परिस्थितीत सोने गाठीशी असणे फायदेशीर ठरु शकते.
सोन्याची मोठी झेप
जर गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर सोन्याची लांब उडी लक्षात येईल. सोने 31 हजार रुपयांहून 61 हजार रुपयांवर पोहचले आहे. सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट कमाई करुन दिली आहे. आता 1 एप्रिलपासून हॉलमार्किंग सोने विक्री आणि खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सोन्यावर (Gold) 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे शुद्ध सोन्याची हमी ग्राहकांना मिळाली आहे.
गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
11 वर्षांत भाव डबल
कोरोना काळात वाढला भाव