Infosys Result : इन्फोसिस कंपनीने केली रेकॉर्डब्रेक कमाई, इंग्लंड पंतप्रधानांच्या पत्नीने इतक्या कोटींचा कमाविला जबरदस्त नफा

| Updated on: Apr 14, 2023 | 10:25 AM

Infosys Result : इन्फोसिस कंपनीने रेकॉर्डब्रेक कमाई केली. त्याचा फायदा इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला पण झाला. त्यांच्या पत्नीने कोट्यवधींची कमाई केली.

Infosys Result : इन्फोसिस कंपनीने केली रेकॉर्डब्रेक कमाई, इंग्लंड पंतप्रधानांच्या पत्नीने इतक्या कोटींचा कमाविला जबरदस्त नफा
Follow us on

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे (Infosys IT Company) तिमाही निकाल हाती आले आहेत. या कंपनीने बक्कळ कमाई केली आहे. या कंपनीला जवळपास 57 कोटी रुपयांचा शुद्ध नफा झाला. त्यामुळे इन्फोसिसने शेअरधारकांना 17.50 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक (Britain Prime Minister) यांच्या पत्नीला कोट्यवधींचा फायदा झाला. आश्चर्याचा धक्का बसला ना, तर ऋषी सुनक यांच्या पत्नी, अक्षता मूर्ती सुनक (Akshata Murthy Sunak) ही इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहे. इन्फोसिसमधून मूर्ती परिवार आणि त्यांच्या मुलीला कितीचा फायदा झाला.

इतका देणार लांभाश
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023 साठी अंतिम लाभांशाची घोषणा केली. प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मूर्ती कुटुंबियांना लाभांशातून 264.17 कोटी रुपयांची कमाई झाली. लाभांशासाठी पात्र शेअरधारकांमध्ये नारायण मूर्ती, त्यांची पत्नी सुधा एन. मुर्ती, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती सुनक आहे.

अक्षता मूर्ती यांना इतका फायदा
अक्षता मूर्ती सुनक यांची इन्फोसिसमध्ये जास्त हिस्सा, वाटा नाही. डिसेंबर तिमाहीमधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अक्षता मूर्ती यांच्याकडे 31 डिसेंबर, 2022 पर्यंत 3,89,57,096 शेअर म्हणजे, 1.07 टक्के हिस्सेदारी आहे. लाभांश जाहीर झाल्यानंतर अक्षता मूर्तीला 68.17 कोटी रुपयांची कमाई झाली.

हे सुद्धा वाचा

कुटुंबाला एकूण 264 कोटींचा नफा
इन्फोसिसला या आर्थिक वर्षात ( FY23) अंतिम लाभांश जाहीर झाला. प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश देण्यात येणार आहे. त्यानुसार, नारायण मूर्ती, त्यांची पत्नी सुधा एन. मुर्ती, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती सुनक यांना लाभांशातून एकूण 264.17 कोटी रुपयांची कमाई झाली.

14,200 कोटींचा लाभांश
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023 साठी अंतिम लाभांश जाहीर केला. तो 17.50 रुपये प्रति शेअर होता. अतिरिक्त अंतिम लाभांशाचे अगोदरच वाटप करण्यात आले आहे. गेले आर्थिक वर्ष 2022 पेक्षा यंदा कंपनीने 9.7 टक्के अधिक लाभांश दिला आहे. आर्थिक वर्ष 2023 साठी कंपनीने एकूण 14,200 कोटी रुपयांचा लाभांश जाहीर केला.

कसा झाला फायदा

  1. डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अक्षता मूर्ती यांच्याकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत 3,89,57,096 शेअर म्हणजे, 1.07 टक्के वाटा होता. त्यांना यामाध्यमातून 68.17 कोटी रुपयांची कमाई झाली.
  2. कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्याकडे 4.3 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. डिसेंबर तिमाहीत त्यांच्याकडे 1,66,45,638 शेअर अथवा 0.46 टक्के वाटा आहे. लाभांशामुळे त्यांना 29.12 कोटी रुपयांचा फायदा झाला.
  3. सुधा मूर्ती यांच्याकडे या कंपनीचे 3,45,50,626 शेअर्स आहेत. त्यांचा कंपनीत 0.95 टक्के वाटा आहे. या लाभांशामुळे त्यांना 60.46 कोटी रुपयांचा फायदा झाला.
  4. नारायण मूर्ति यांचा मुलगा रोहन मूर्ती याच्याकडे इन्फोसिसचे 6,08,12,892 शेअर्स आहेत. रोहनचा या कंपनीत 1.67 टक्के वाटा आहे. या लाभांशामुळे त्याने 106.42 कोटी रुपये कमाई केली आहे.