नवी दिल्ली : या शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी NSE मध्ये सूचीबद्ध असलेल्या एका स्मॉलकॅप कंपनीतून अवघ्या 5 वर्षांत 5 पट रिटर्न मिळवला आहे. छोटा पॅकेट बडा धमका, असा हा मामला ठरला आहे. काही स्मॉल साईज कंपन्या पण खास कमाई मिळवून देतात. त्यामुळे अनेक जण अभ्यास करुन अशा कंपन्यांवर डाव खेळतात. काही कंपन्या प्रामाणिकपणे आगेकूच करत असतात. त्यांची योग्य निवड केली तर गुंतवणूकदारांना फायदाच फायदा होतो. शेअर बाजारातील या स्मॉल कॅप कंपनीने (Small Cap Company) बिग बींना भरभरुन कमाई करुन दिली. ही इलेक्ट्रिक वायर तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीचे नाव डीपी वायर (DP Wires) असे आहे. अमिताभ हरिवंश राय बच्चन यांच्याकडे सप्टेंबर 2018 रोजी या कंपनीचे 3,32,800 शेअर वा 2.45 टक्के वाटा होता.
वायरिंग कंपनीचे शेअर मूल्य 3 सप्टेंबर, 2018 रोजी 74 रुपये होते. 1 मार्च, 2023 रोजी या शेअरने 4.87 पट वा 387 टक्क्यांची उसळी घेतली. हा शेअर सध्या 360.35 रुपये झाला आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये कंपनीचे मार्केट कॅप 100.40 कोटी रुपये होते. तर या 1 मार्च रोजी कंपनीचे बाजार भांडवल 488.92 कोटी रुपये झाले आहे. म्हणजे मार्केट कॅप चार पट वाढले आहे. 20 सप्टेंबर, 2022 रोजी वायर कंपनीच्या शेअरने नवीन रेकॉर्ड केला. हा शेअर 502.80 रुपयांवर पोहचला आहे. हा उच्चांकी उसळी गेल्यावर्षी कंपनीच्या शेअरने घेतली.
शुक्रवारी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून आली. आकड्यावरुन एनएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 1.89 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर सध्या 361.30 रुपयांवर व्यापार करत आहे. तर एक दिवसांपूर्वी 2 मार्च रोजी कंपनीचा शेअर घसरला. 354.60 रुपयांवर हा शेअर बंद झाला. शुक्रवारी हा शेअर 359.85 रुपयांवर उघडला. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 361.70 रुपये उच्चांकावर होता. आज कंपनीचे मार्केट कॅप 490 कोटी रुपयांवर पोहचले.
31 डिसेंबर, 2022 पर्यंत कंपनीच्या प्रमोटर्सची 70.40 टक्के हिस्सेदारी आहे. डीपी वायर्समध्ये रिटेल गुंतवणूकदार 8.88 टक्के आणि वैयक्तिक संपत्तीत 8.85 टक्के वाटा आहे. आर्थिक वर्ष 2017 मध्ये 195.38 कोटी रुपयांची विक्री झाली. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीची वार्षिक शुद्ध विक्री 25.70 टक्के वाढून 613.24 कोटी रुपये इतकी झाली.
तर याच काळात कंपनीचा निव्वळ नफा 42.05 टक्के होता. त्यानंतर कंपनीचा निव्वळ नफा 5.02 कोटी रुपयांनी वाढून 29.05 कोटी रुपये झाला. 31 डिसेंबर, 2022 रोजी संपलेल्या 9 महिन्यात कंपनीची एकूण विक्री 90.54 टक्क्यांनी वाढून 828.67 कोटी रुपये झाली. या काळात निव्वळ नफ्यात 17.61 टक्क्यांची वाढ होऊन हा निव्वळ नफा 25.95 कोटी रुपये झाला.