नवी दिल्ली : यावर्षातील दुसरा महिना, फेब्रुवारी (February) आता अवघ्या दोन दिवसांनी संपेल. मार्च महिना लागलीच येऊन धडकेल. मार्च महिन्यात सण, उत्सवाची सुरुवात होत आहे. भारतीय परंपरानुसार, मराठी महिन्यानुसार सण, उत्सव या महिन्यात येतात. मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँकांना सुट्टी (Bank Holiday) आहे. या तिसऱ्या महिन्यात बँकांचे कामकाज 12 दिवस बंद राहतील. मार्च महिन्यात होळी हा मोठा सण येतो. हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. याकाळात बँक बंद राहील. मार्च, 2023 मध्ये चैत्र नवरात्र, गुढीपाडवा, रामनवमी हे पण सण आहेत. तसेच रविवार आणि शनिवारची सुट्टी असेल. पुढील महिन्यात 3, 5, 7, 8, 9, 11, 12, 19, 22, 25, 26 आणि 30 मार्च रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहितील. त्यामुळे ग्राहकांना वेळतच बँकेसंबंधीची कामे उरकून घेणे महत्वाचे आहे.
पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या. RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.
बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
मार्च 2023 महिन्यात या दिवशी बँका राहतील बंद
05 मार्च, 2023- रविवार सुट्टी
07 मार्च, 2023- होळी, होलिका दहन
08 मार्च, 2023- होळी, धुळवड
09 मार्च, 2023- बिहारमधील पाटना येथे होळीनिमित्त बंद राहील
11 मार्च, 2023- दुसरा शनिवारी, सुट्टी
12 मार्च, 2023- रविवार सुट्टी
19 मार्च, 2023- रविवार सुट्टी
22 मार्च, 2023- गुढी पाडवा, तेलगू नवीनवर्ष
25 मार्च, 2023- मार्च महिन्यातील चौथा शनिवार
26 मार्च, 2023- रविवार सुट्टी
30 मार्च, 2023- रामनवमी