RBI Loan : कर्जावरील पठाणी वसुलीला बसणार चाप! नाहीतर बँका, वित्तीय संस्थांना होणार ताप

| Updated on: Aug 18, 2023 | 1:59 PM

RBI Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या मनमानी काराभाराला लगाम घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहे. बँका आणि वित्तीय संस्थांच्या पठाणी वसुलीला यामुळे चाप बसेल. याविषयीच्या नियमांचे बँकांना पालन करावे लागणार आहे.

RBI Loan : कर्जावरील पठाणी वसुलीला बसणार चाप! नाहीतर बँका, वित्तीय संस्थांना होणार ताप
Follow us on

नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India-RBI) आणि वित्तीय संस्थांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. आरबीआयने बँकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी हा नवीन बदल केला आहे. या नियमानुसार कर्ज खात्यावर दंड लावण्याविषयीच्या नियमांविषयी हे निर्देश लागू करण्यात आले आहे. महसूल वाढविण्यासाठी बँका कर्ज खात्यावर (Loan Account) दंडाचा मारा करत आहे. वाढीव ईएमआयमुळे (EMI) कर्जदार गेल्या वर्षाभरापासून अगोदरच मेटाकुटीला आले आहेत. त्यातच हप्त्याला उशीर झाला. तांत्रिक अडचण उद्भवली वा इतर कारण समोर आले तर बँक ग्राहकांकडून पठाणी वसूली करत आहे. याविरोधातील तक्रारींचा पूर आरबीआयकडे आला. आरबीआयने या तक्रारींची दखल घेत बँका, वित्तीय संस्थांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार बँकांच्या पठाणी वसुलीला चाप बसणार आहे.

RBI ने तयार केले नवीन नियम

हे सुद्धा वाचा

रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, बँकांना कर्ज खात्यावरील दंडाविषयीच्या नियमाबाबत मनमानीला आवर घालण्यास सांगण्यात आले आहे. बँकांनी दंड वसुलीबाबत नियमाच्या हद्दीतच कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याविषयीच्या तक्रारी वाढत असल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

काय करतायेत बँका

बँका कर्जावरील व्याजतच दंडाची रक्कम जोडतात. त्यानंतर यावर कर्जदारांकडून व्याजावर व्याज आकारुन पठाणी वसुली करतात. ही बाब तक्रारींमुळे समोर आली. अनेक बँकांनी अशी फसवणूक केली आहे. नियमांचा दाखल देत बँकांनी व्याजावर व्याज कमावले. त्यामुळे कर्जदारांचे कंबरडे मोडले. त्यांना ईएमआय वेळेत न चुकवण्याची मोठा आर्थिक फटका बँकांमुळे बसत आहे.

आरबीआयकडून महत्वपूर्ण बदल

कर्जदारांची बँका पिळवणूक करत असल्याचे समोर आले. बँकांनी मोठ्या प्रमाणावर अशी प्रॅक्टिस केल्याचे समोर आले. या तक्रारींची दखल आरबीआयने घेतली. कर्जदार दिवाळखोरीत गेला. त्याने ईएमआय चुकवले नाही तर अशा स्थितीत दंड आता पीनल चार्ज म्हणून घेण्यात येईल, पीनल इंटरेस्ट म्हणून ग्राहकांकडून वसुली करण्यात येणार नाही, असे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

ट्विटर करत दिली माहिती

आरबीआयने नियमातील बदलांची ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. आरबीआयने याविषयीचे परिपत्रक ट्विटरवर पोस्ट केले आहे. यामध्ये बदलेल्या मार्गदर्शक तत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

कधीपासून लागू होईल हा बदल

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, नवीन मार्गदर्शक तत्व हे पुढील वर्षांपासून 1 जानेवरी 2024 रोजीपासून लागू होतील. सर्व व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, स्थानिक बँका, विभागीय, राज्यस्तरावरील बँका यांना हा नियम लागू होईल. प्राथमिक सहकारी संस्था, सहकारी बँका, एनबीएफसी, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, एक्झिम बँक, NABARD, NHB, SIDBI आणि NaBFID हे सर्व यांना हा नियम लागू असेल.