आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत समावेश होणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी स्टायलीश आहेत. त्या आता 60 वर्षांच्या झाल्यात हे त्यांच्याकडे पाहून नक्कीच कोणालाही वाटणार नाही. आजही त्यांची त्वचा या वयातही चकाकत आहे. त्यांचे केस आणि हेअर स्टाईल तसेच ड्रेसिंग सेन्स देखील चांगला आहे. वयासोबतच त्यांचे ग्लॅमर वाढतच चालले आहे. या सर्वाचे श्रेय त्यांच्या डाएटला जात आहे. तसेच त्यांच्या त्वचेची काळजी घेणारे आणि त्यांच्या हेअर स्टायलिस्टनाही याचे श्रेय द्यायलाच हवे. नीता अंबानी यांचे हेअर स्टायलिस्टचे नाव अमित ठाकूर आहे. अमित त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच हेअर केअर संबंधित टिप्स शेअर करीत असतात. त्यांनी त्यांच्या एका व्हिडीओत तीन सवयींबद्दल माहिती दिली आहे. या सवयींपासून आपण जर दूर राहीलो तर आपले केस देखील गळणार नाहीत…
अमित ठाकूर यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये तीन सवयींबद्दल सांगितले आहे ज्या सवयींमुळे केसांचे सर्वात जास्त नुकसान होते, तर पाहूयात कोणत्या आहेत या वाईट सवयी पाहूयात ?
अमित ठाकूर यांनी केसांच्या आरोग्यासाठी दिलेली पहिली टिप्स सांगितली आहेत. ती म्हणजे ओले केस असताना झोपू नये.हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी सांगितले की ओले केस असताना कधीही झोपू नये. झोपण्यापूर्वी केस चांगले कोरडे केले पाहीजेत. कारण ओले केस तुटण्याची शक्यता अधिक असते. केस ओले असताना ते खूपच कमकुवत असतात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी तुमचे केस थंड हवेत चांगले कोरडे करण्याचा प्रयत्न करावा.
बहुतेकदा लोक खूप ओल्या किंवा किंचित ओल्या केसांवर स्ट्रेटनर किंवा इतर उष्णतेची उपकरणे वापरतात. अमितच्या म्हणण्यानुसार, ही सवय केसांसाठी खूपच हानिकारक आहे. ही उपकरणे नेहमी केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच वापरावित. जर तुम्हाला तुमच्या केसांचे आणखीन नुकसान टाळायचे असेल तर हीटिंग टूल्स वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षक उत्पादने वापरण्यास विसरू नका.
केसांच्या आरोग्यासाठी तिसरी सर्वात हानिकारक सवय म्हणजे रात्री उघडे केस ठेवून झोपणे असे अमित ठाकूर यांनी सांगितले. केस उघडे ठेवून झोपल्याने केस तुटण्याचा धोका अधिक वाढतो. झोपताना केस उलटे झाल्यावर केस आणि उशीमध्ये घर्षण निर्माण होते, त्यामुळे केस तुटण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून, झोपण्यापूर्वी, नेहमी आपल्या केसांना सैल पोनी किंवा शॉर्ट बनमध्ये वेणी घालावी.