ऑगस्ट महिन्यात पैशासंबंधीच्या काही सेवा आणि वस्तूच्या किंमतीत बदल दिसू शकतो. या 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती आणि एचडीएफसी क्रेडिट कार्डच्या नियमांत काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येईल. तर 31 जुलै ही आयटीआर भरण्याची अखेरची तारीख आहे. 1 ऑगस्टपासून आयटीआर फाईल करण्याच्या नियमात बदल होईल. करदात्यांना आयटीआर फाईल करताना दंडाची रक्कम भरावी लागेल. हा दंड 5 हजार रुपयांच्या घरात असेल.
LPG सिलेंडरच्या किंमतीत होईल बदल
LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल होतो. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडतो. जुलैमध्ये सरकारने 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात LPG सिलेंडरच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
HDFC बँक क्रेडिट कार्ड नियम
HDFC बँकने 1 ऑगस्टपासून अनेक बदल केले आहेत. त्याचा थेट परिणाम क्रेडिट कार्ड धारकांवर पडेल. ऑगस्टपासून Paytm, CRED, Mobi Kwik आणि Cheq सारख्या थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे व्यवहार केल्यास, पेमेंट केल्यास रक्कमेवर 1% शुल्क लागते. त्यासाठी 3000 रुपयांची व्यवहार मर्यादा आहे. 15,000 रुपयांपेक्षा कमी प्रति इंधन व्यवहारावर कोणतेही शुल्क लागणार नाही.
तर अतिरिक्त थकीत रक्कमेवर विलंब शुल्क वाढवण्यात आले आहे. आता 100 ते 1,300 रुपयांदरम्यानचा भार ग्राहकांना सोसावा लागेल. एचडीएफसी बँक 1 ऑगस्ट रोजी टाटा न्यू इनफिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्डसंबंधी काही बदल होतील. वापरकर्त्याने टाटा न्यू युपीआय आयडीचा वापर केला तर युपीआय व्यवहारावर 1.5% न्यूकॉईन मिळेल.
गुगल मॅप्ससंबंधी नियमांमध्ये बदल
गुगल मॅप्सने भारतातील नियमासंबंधी काही बदल केले आहेत. 1 ऑगस्टपासून हे नियम लागू होतील. कंपनीने भारतात त्यांच्या सेवांविषयी मोठी घोषणा केली आहे. सेवा शुल्कात कंपनीने 70 टक्क्यांपर्यंतची कपात केली आहे. पण त्याचा एकदम परिणाम युझर्सवर दिसणार नाही. टेक जायंट गुगलने सर्वसामान्य ग्राहकांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लावलेले नाही.