नवी दिल्ली : बोनस शेअर (Bonus Share) हा कमाईचा मोठा स्त्रोत आहे. शेअर बाजारात एखादी कंपनी तुम्हाला अनेक फायदे मिळवून देते. लाभांश, बोनस शेअर, इतर फायदे जर गुंतवणूकदारांना मिळत असेल तर अशा कंपन्या तुमच्यासाठी दुभत्या गायीपेक्षा कमी नाहीत. गुंतवणूकदारांना (Investors) बोनस शेअर एका खास प्रमाणात मिळतो. जर एखादी कंपनी 3:2 असा बोनस देत असेल तर त्याचा अर्थ प्रत्येक 2 शेअरवर तुम्हाला 3 बोनस शेअर मिळेल. बोनस इश्यू झाल्यावर इक्विटी कॅपिटल वाढते. पण फेस व्हॅल्यूमध्ये (Face Value) कोणताही बदल होत नाही. फेस व्हॅल्यूत बदल न झाल्याने गुंतणूकदारांना भविष्यात लाभांशच्या रुपात त्यांना फायदा होईल.
गुंतवणूकदारांचा रामराम
NSE च्या आकड्यानुसार गेल्या 9 महिन्यांत जवळपास 53 लाख गुंतवणूकदारांनी बाजारात काढता पाय घेतला आहे. यामध्ये जागतिक घडामोडींचा मोठा वाटा आहे. भूराजकीय घडामोडी, अमेरिका, युरोपातील वित्तीय आणि बँकिंग संकट, इंधनाचे चढे दर, सोने-चांदीतून मिळणारा मोठा परतावा, रेपो रेटमुळे वाढलेले व्याजदर यामुळे शेअर बाजारातून फार काही हाती येत नसल्याचा नवख्या गुंतवणूकदारांचा समज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या दृढनिश्चियाला तडा गेला आहे.
या कंपन्यांनी केला फायदा
या टॉप-10 कंपन्यांनी आतापर्यंत बोनस शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये काही सरकारी कंपन्या आहेत तर काही खासगी कंपन्या आहेत. बोनस इश्यू झाल्यावर इक्विटी कॅपिटल वाढते. त्याचा लाभ अनेकांना होतो. सीएनबीसी आवाजने याविषयीचा अहवाल तयार केला आहे.