Mutual Fund | या म्युच्युअल फंड्सने केले मालामाल, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस

| Updated on: Feb 21, 2024 | 10:03 AM

Mutual Fund | भारतीय शेअर बाजारात गेल्या एका वर्षात तेजीचे सत्र दिसून आले. त्याचा परिणाम म्युच्युअल फंडाच्या कामगिरीवर पण दिसून आला. अनेक म्युच्युअल फंड्सने गुंतवणूकदारांना मालदार केले. त्यांना जबरदस्त परतावा दिला. या क्षेत्रातील फंडने तर एका वर्षात 97 टक्क्यांचा परतावा दिला.

Mutual Fund | या म्युच्युअल फंड्सने केले मालामाल, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Follow us on

नवी दिल्ली | 21 February 2024 : भारतीय शेअर बाजाराची एक वर्षांपासून जोरदार घौडदौड सुरु आहे. या तेजीच्या सत्रामुळे उत्साहाचे वातावरण आहे. बीएसई आणि एनएसई नवनवीन उच्चांक गाठत आहे. त्याचा परिणाम म्युच्युअल फंडावर पण दिसून येत आहे. काही म्युच्युअल फंड्सने तर गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात या म्युच्युअल फंडने धमाकेदार कामगिरी बजावली आहे. गेल्या एका वर्षात सेक्टोरल, स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंड्सने बहारदार कामगिरी बजावली आहे. त्यांनी एका वर्षात 50 ते 94 टक्क्यांदरम्यान रिटर्न दिला आहे.

  1. PSU फंड्सने दिला जोरदार रिटर्न – गेल्या एका वर्षात पीएसयू म्युच्युअल फंड्सने सर्वाधिक परतावा दिला. गेल्या एका वर्षात या श्रेणीतील म्युच्युअल फंड्सने 94.10 टक्क्यांचा रिटर्न दिला. या काळात आदित्या बिर्ला सन लाईफ पीएसयू इक्विटी फंडने 96 टक्के तर एसबीआय पीएसयू फंडने गुंतवणूकदारांना 92 टक्क्यांचा परतावा दिला. गेल्या एका वर्षांपासून मोदी सरकारने सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या विकासावर भर दिला. या कंपन्यांकडे आता परदेशातून पण ऑर्डर येत आहेत.
  2. इन्फ्रा फंड्स पण स्पर्धेत – इन्फ्रा फंड्सची कामगिरी पण जोरदार होती. गेल्या एका वर्षात या फंड्सने जोमात काम केले. या श्रेणीत 58 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे. एका वर्षात एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडने 79.37 टक्क्यांच्या रिर्टनसह सर्वाधिक कमाई करुन दिली आहे. तर निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंडने या काळात 73.66 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
  3. फार्मा फंड्स – औषधीशास्त्र क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी जोरदार कामगिरी बजावली आहे. गेल्या एका वर्षात या श्रेणीत सरासरी 55.99 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. ICICI Prudential Pharma Healthcare And Diagnostic Fund ने 62.73 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कॅटेगिरीत हा सर्वात कमाई करुन देणारा फंड ठरला आहे.
  4. स्मॉल आणि मिड कॅप फंड्स – स्मॉल आणि मिडकॅप फंड्सने गेल्या एका वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे. स्मॉलकॅप कॅटेगिरीत सरासरी 53.56 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. तर मिडकॅप कॅटेगिरीत सरासरी 50.67 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना कमाईचा मौका मिळाला आहे.
  5. हे सुद्धा वाचा