नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : शेअर बाजार सध्या तेजीच्या लाटेवर स्वार आहे. या वर्षाच्या अखेरीला शेअर बाजाराने अनेक रेकॉर्ड इतिहासजमा केले. गेल्या दहा वर्षांत बाजाराने मोठी झेप घेतली आहे. 22,000 अंकावरुन आता निर्देशांक 71,000 अंकांच्या पुढे गेला आहे. अनेक गुंतवणूकदार मोठ्या स्टॉकऐवजी लहान स्टॉकवर डाव लावत आहे. शेअर बाजार सध्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. 100 रुपयांच्या आतील या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. यामधील अनेक स्टॉक्स सरकारी कंपन्यांचे आहे. त्यांनी बंपर रिटर्न दिले. या स्टॉकने या वर्षात इतका परताव दिला आहे.
या पेनी स्टॉक्सने केले मालामाल
- IRFC – या वर्षात भारतीय रेल्वेचा पेनी स्टॉक IRFC ने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला. एका वर्षात या स्टॉकने 187.84% परतावा दिला. या स्टॉकचा 52 आठवड्यात 25.40 रुपयांवर होता. तो आता 94.70 रुपयांवर पोहचला आहे.
- IREDA – अक्षय ऊर्जा क्षेत्रातील सरकारी कंपनी IREDA चा शेअर नुकताच बाजारात सूचीबद्ध झाला आहे. एका महिना पण झाला नाही, पण या शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला. या शेअरने 52 आठवड्यात 50 रुपयांवर होता. आतापर्यंत हा स्टॉक 123 रुपयांवर पोहचला.
- HUDCO – हॉऊसिंग डेव्हलपमेंटच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना एका वर्षात 96.37% रिटर्न दिला. हडकोचा शेअर 52 आठवड्यात 40.40 रुपयांच्या निच्चांकावर होता तर या शेअरचा उच्चांक 110.75 रुपये आहे.
- अलोक इंडस्ट्रीज – मुकेश अंबानी यांची ही कंपनी आहे. अलोक इंटस्ट्रीजचा पेनी स्टॉक बाजारात चांगली कामगिरी करत आहे. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 42.99% रिटर्न दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 10 रुपये तर आतापर्यंतचा उच्चांक 22.95 रुपयांवर आहे.
- SUZLON – सुजलॉन या कंपनीच्या शेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला. या स्टॉकचा 52 आठवड्यातील निच्चांक 6 रुपये तर उच्चांक 44 रुपये होता.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.