Penny Stock : या पेनी स्टॉकवर ठेवा लक्ष! होऊ शकता मालामाल

| Updated on: Aug 27, 2023 | 7:07 PM

Penny Stock : सोमवारी, शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला या पेनी स्टॉक्सकडे लक्ष ठेवावे लागेल. यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला त्यातून परतावा मिळू शकतो.

Penny Stock : या पेनी स्टॉकवर ठेवा लक्ष! होऊ शकता मालामाल
Follow us on

नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात नरमाईचे धोरण आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून येत आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात शुक्रवारी घसरण दिसून आली. निर्देशांक सतत दुसऱ्या सत्रात 458 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीत पण घसरण झाली. निफ्टी 19,300 अंकावर बंद झाला. सोमवारी तुम्ही बाजारात गुंतवणुकीचा (Investment) विचार करत असाल तर या पेनी स्टॉकवर (Penny Stock) तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. या शेअरमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदा मिळवून देईल. तुम्हाला चांगला परतावा मिळेल. जिओ फायनेन्शिअलचा शेअर 4 टक्क्यांनी मजबूत झाला. तर वोडाफोन आयडियाचा शेअर्समध्ये 9 टक्क्यांची उसळी आली. शॉपर्स स्टॉपमध्ये 13 टक्के तर जीएमआर एअरपोर्ट जवळपास 5 टक्के घसरण आली.

शुक्रवारी घसरण

शुक्रवारी स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिडकॅप इंडेक्समध्ये घसरण दिसून आली. बीएसई निर्देशांकात बजाज फायनान्स एशियन पेंट आणि भारती एअरटेलच्या शेअरने जोरदार प्रदर्शन दाखवले. तर जेएसडब्ल्यू स्टील, इंडसईंड बँक आणि लार्सन अँड टूब्रोचे शेअर घसरले.

हे सुद्धा वाचा

या पेनी शेअरवर ठेवा लक्ष

सोमवारी हे पेनी शेअर तुमचे नशीब उघडू शकतात. या सात पेनी स्टॉक्समध्ये चांगला परतावा मिळू शकतो. सोमवारच्या व्यापारी सत्रात गुंतवणूकदारांना विसागर पॉलिटेक्स, Vodafone-idea, रिलायन्स कम्युनिकेशन, गोधा कार्बन, बिर्ला टायर्स, रीजेंसी सेरेमिक्स आणि रवी कुमार डिस्टलरीज हे पेनी शेअर कमाल करु शकतात, असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Visagar Polytex

शुक्रवारी शेअर बाजारात घसरणीचे सत्र होते. अशावेळी विसागर पॉलिटेक्सच्या शेअरने तेजी नोंदवली. हा शेअर चांगलाच वधारला. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी ताबडतोब खरेदी केली. त्यामुळे या शेअरला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. त्यानंतर नफेखोरी सुरु होती. तरीही हा शेअर 4.76 टक्के तेजीसह चमकला.

Vodafone Idea

भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी Vodafone-idea चे शेअर्सने शुक्रवारी मोठी कामगिरी बजावली. शुक्रवारी या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. हा शेअर 11 टक्के तेजीसह बंद झाला.

Reliance Communications

रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअरमध्ये सॉलिड प्राईस वॉल्यूम ब्रेकआउट दिसून आला. या शेअरमध्ये चांगलीच तेजी दिसून आली. या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट दिसून आले. हा देश सोमवारी हालचाल दाखवू शकतो.

या शेअरवर ठेवा लक्ष

Godha Cabcon and Insulation च्या शेअरमध्ये शुक्रवारी 5.26% तेजी दिसून आली. तर Birla Tyers मध्ये 4.63%, Regency Ceramics मध्ये 4.96 टक्के आणि Ravi Kumar Distilleries च्या शेअरमध्ये 4.97 टक्के तेजी दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.