मुंबईच्या या तरूणांनी अत्यंत छोट्या वयात उभी केली 33 हजार कोटीची कंपनी

| Updated on: Feb 24, 2023 | 2:02 PM

पवई आयआयटी मधून कंम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींग पूर्ण केलेल्या दोघा युवा तरूणांनी नवा आदर्श निर्माण केला आहे ते उद्याचे इलॉन मस्क आहेत.

मुंबईच्या या तरूणांनी अत्यंत छोट्या वयात उभी केली 33 हजार कोटीची कंपनी
Ritesh Arora and Nakul Aggarwal
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. प्रत्येक छोट्या गोष्टीची सुरूवात लहान गोष्टीतून होत असते. सक्सेसफूस स्टार्टअप सुरू करण्यासाठी अत्यंत दुर्दम्य इच्छा शक्ती हवी. जगातील अनेक स्टार्टअपची सुरूवात छोट्याशा घरातून झाली. आज गुगल किंवा अॅमेझॉन सारख्या कंपन्यांची सुरूवात देखील अशा काही विचारांतूनच झाली आहे. असाच ब्राऊजरस्टेक नावाचा एक क्लाऊड वेब आणि मोबाईल टेस्टींगची कहाणी अशीच आहे.

ब्राऊझरस्टॅक ( BrowserStack ) कंपनीची स्थापना

मुंबईच्या पवई आयआयटीचे नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा या दोघांनी 2011 मध्ये ब्राऊझरस्टॅक ( BrowserStack ) कंपनीची स्थापना केली. त्या दोघांनी 2006  मध्ये आयआयटीतून कंम्प्युटर सायन्सची डिग्री मिळविली आणि इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर पाच वर्षांनी ही कंपनी स्थापण केली, या कंपनीचा बिझनेस जगभरात पसरला आहे. केवळ 12 वर्षांत या कंपनीचे भागभांडवल 33 हजार कोटीवर पोहचले आहे.

मुंबई आयआयटीतून ग्रॅज्युएट झाले

मुंबईतील पवई आयआयटीतून पाच वर्षांत ग्रॅज्युएट झालेल्या नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा यांचा भारतीय सॉफ्टवेअर युनिकॉर्न ब्राऊझरस्टॅक सातत्याने प्रगती करीत आहे. या कंपनीचा महसूल सन 2021 मध्ये 263.3 कोटी रूपयांवरून 59 टक्के वाढत आर्थिक वर्ष 2022  मध्ये 418.4 कोटी रूपये झाला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या मते कंपनीची सह संस्थापक रितेश आणि नकुल यांची एकूण संपत्ती प्रत्येकी 12 हजार कोटी आहे. तर कंपनीचा टर्न अवर 33,000 कोटी रुपये आहे.

सहा महिन्यातच फायद्यात आली

BrowserStack ही जगातील अडव्हान्स सॉफ्टवेअर टेस्टींग प्लॅटफॉर्म आहे. दोनशे मिलियनची फंडींग मिळाल्यानंतर साल 2022 मध्ये ही कंपनी युनिकॉर्न झाली. याचे सॉफ्टवेअर – एज-ए- सर्व्हीस फर्मचे मूल्य 4 बिलीयन डॉलर ( सुमारे 33,106 ) आहे. नकुल अग्रवाल आणि रितेश अरोरा यांची कंपनी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यातच फायद्यात आली आहे.

दोघे कंपनीची अशी जबाबदारी सांभाळतात…

रितेश अरोरा आणि नुकुल अग्रवाल यांनी कंपनीतील जबाबदारी एकमेकांमध्ये वाटून घेतली आहे. रितेश अरोरा हा कंपनीचा सीईओ म्हणून जबाबदारी पाहतो. तर नुकुल अग्रवाल हा कंपनीत सीटीओ म्हणून पदभार सांभाळत आहे.