हैदराबाद : बिझनेसमॅन नसीर खान हे McLaren 765 LT स्पायडरचे मालक बनले. देशात महाग सुपरकारपैकी ही एक कार समजली जाते. Cartoq.com नुसार, McLaren 765 LT स्पायडर ही देशातील सर्वात महाग सुपरकार आहे. या सुपरकारची किंमत १२ कोटी रुपये आहे. हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये या कारला डिलिव्हर करण्यात आलं. नसीर खान हे देशातले ७६५ एलटी स्पायडरचे पहिले ग्राहक असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय.
यासंदर्भात नसीर खान यांनी इंस्टावर पोस्ट केली. घरी तुमचं स्वागत आहे. मॅकलेरन ७६५ एलटी स्पायडर डिलिव्हर करण्यात आलीय. यासाठी ही अतिशय सुंदर जागा आहे. इंस्टाग्रामवरील पोस्टवर फोटो आणि रील आहे. खान आपल्या लाल रंगाच्या McLaren 765 LT स्पायडरसह पोज देत आहेत.
Cartoq.com नुसार, ही स्पायडर कार McLaren च्या वतीनं बनविण्यात आलीय. ही एक सर्वात वेगवान कारपैकी एक आहे. या कारचा वरचा भाग फक्त ११ सेकंदात उघडतो. कार ४ लीटर ट्वीन टर्बोचार्ज्ड व्ही ८ पेट्रोल इंजीनद्वारे संचालित केली जाते. इंजीन ७६५ पीएस आणि ८०० एमएमचा पीक टॉर्क उत्पन्न करते.
नसीर खान हे कार संग्रह करून ठेवतात. तसेच ते उद्योगपतीही आहेत. नेहमी लग्झरी कारसोबत सोशल मीडियावर पोज देताना दिसतात. नसीर खान यांच्याकडं रोर्स राईस, कुलीनन ब्लॅक, फेरारी ८१२ सुपरफास्ट, मर्सिडीज बेंझ, फोर्ड मस्टँग तसेच अन्य महागड्या कार आहेत.
नसीर खान यांना वेगवेगळ्या कार संग्रह करून ठेवण्याचा छंद आहे. हे बिझनेसमॅन असल्यानं त्यांना ते शक्य होतं. विशेष म्हणजे ते नवीन कारसह फोटो करत असतात.