नवी दिल्ली : दारु बंदीसाठी (Ban on Liquor) सर्वत्र सध्या आंदोलने होताना आपण पाहतो. अनेक गावात महिला दारु दुकानांना जोरदार विरोध करता. त्यासाठी जनमत घेण्यात येते. काही जिल्ह्यात तर संपूर्ण दारुबंदी करण्यात आली आहे. पण एक ठिकाण असे आहे की, जिथे सरकारचं (Government) नागरिकांना मनसोक्त दारु पिण्याचे (Alcohol Drinking) आवाहन करत आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर असं कोणतं ठिकाण आहे, जिथं दारुला अमृताचा दर्जा मिळाला आहे? चला तर पाहुयात..
जपान सरकारने (Japan Government) तिथल्या तरुणाईला बिनधास्त दारु पिण्याचे (Alcohol) आवाहन केले आहे. सरकारचं दारु पिण्याचा सल्ला देत आहे. विशेष म्हणजे जपानी सरकारने त्यासाठी खास कॅम्पेनही राबविले आहे. पण एवढा खटाटोप कशासाठी करण्यात येत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल..
जपान सरकारने नागरिकांसाठी Sake Viva कॅम्पेन सुरु केले आहे. या कॅम्पनचे उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांना दारु पिण्यासाठी प्रेरित करणे असे आहे. खासकरुन 20 ते 39 या वयोगटातील तरुणांना दारु पिण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.
जपान सरकार दारुची विक्री वाढवण्यावर भर देत आहे. कारण त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपातून मोठी रक्कम जमा होईल. जास्तीत जास्त कर जमा व्हावा यासाठी जपान सरकारने स्पर्धेचेही आयोजन केले आहे. त्यातंर्गत जास्तीत जास्त दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.
ही सर्व आयडियाची कल्पना अर्थातच जपानचे केंद्रीय कर संस्था राबवित आहे. लोकांकडून जास्तीत जास्त कर जमा होऊन राष्ट्रीय खजिना मजबूत करण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात येत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल असा सरकारचा प्रयत्न आहे.
कोरोना काळात जपानमध्ये नागरिकांनी दारु पिणे कमी केले होते. ज्यांचे वय जास्त आहे, त्यांनी तर जवळजवळ दारु सोडूनच दिली होती. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कर रुपाने मिळणारी रक्कम कमी झाली.
महसूलही तोटा कमी करण्यासाठी जपानच्या नॅशनल टॅक्स एजेंसीने दारु पिण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. महसूली तोटा भरु काढण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल असा सरकारचा दावा आहे.