Insurance Industry | कोरोनाने (Covid-19) जाता जाता भारतीयांना विम्याचे महत्व पटवून दिले. कोरोना काळातील मृत्यूचा तांडव पाहून अनेकांचा विमा घेण्याकडे कल वाढला आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. कोरोना लागण झाल्याने उरलीसुरली कमाईही संपली. त्यामुळे अनेकांनी मोठ्या आर्थिक खर्चासाठीची (Financial Need) तरतूद म्हणून आरोग्य विमा, सेवा विमा घेण्यास सुरुवात केली. कोरोनानंतर भारतीय विमा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला असून विमा (Insurance) घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही जागरुकता कायम राहिल्यास आणि विम्याचे दावे झटक्यात सोडवल्यास भारत लवकरच जगातील 6 व्या क्रमांकाची विमा बाजारपेठ (Insurance market) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु हा टप्पा गाठायला भारताला अजूनही 10 वर्षे लागतील. त्यामुळे विमा क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहे. सरकारने विमा एजंटचे कमिशन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने स्वस्त विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वित्झर्लंडस्थित पुनर्विमा कंपनी स्वीस रे इन्स्टिट्यूटने याविषयीचे भाकीत केले आहे. त्यांनी याविषयीचा अहवालही तयार केला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) प्रयत्नांमुळे हा बदल घडून येत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या विमा बाजाराला विस्ताराचे वेध लागले आहेत. भारतातील एकूण विमा प्रीमियम सरासरी 14% दराने वाढेल. येत्या 10 वर्षांत भारत ही जगातील सर्वांत मोठी विमा बाजारपेठ म्हणून उदयास येईल, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 2021 मध्ये भारतीय विमा बाजारपेठ जगात 10 व्या स्थानी होती. आता विमा पॉलिसी घेणाऱ्यांची संख्या पाहता हा आकडा लवकरच वाढेल आणि जागतिक क्रमवारीत भारत 6 व्या स्थानी झेपावेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या अहवालानुसार, भारतीय विमा प्रीमियममध्ये 2022 म्हणजे यंदा 6.6% वाढ नोंदवण्यात आली. तर पुढील वर्षी प्रीमियममध्ये 7.1% दराने वाढ अपेक्षित आहे. हा अंदाजित वाढीचा दर लक्षात घेता, 2022 मध्ये भारतातील जीवन विमा प्रीमियम 100 अब्ज डॉलर पार करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
देशात आरोग्य विम्याबद्दल जागरुकता वाढली
रुग्णालयातील खर्चाला आळा घालण्यासाठी
बचतीला सुरुंग लागू नये, ती सुरक्षित राहण्यासाठी
महागड्या उपचारांचा खर्च परस्पर होण्यासाठी
2020 मध्ये कोरोनात रोजगार बुडाल्याने विमा विक्रीत किंचित घट झाली होती.
मात्र, 2021 मध्ये त्यात 5.8% वाढ झाली आहे. यावर्षी महागाईमुळे त्यात 4.5% पर्यंत कमी येण्याचा अंदाज
परंतु, 2023 ते 2032 दरम्यान या क्षेत्राची वार्षिक 8 टक्के वाढीचा अंदाज