नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : शेअर बाजार (Share Market) सातत्याने आगेकूच करत आहे. निफ्टीने 20000 अंकाचा टप्पा ओलांडला. बाजार नवनवीन रेकॉर्ड करत आहे. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 047 टक्क्यांनी वधारला. बीएसईने 67,927 अंकांचा नवीन टप्पा गाठला आहे. तर निफ्टीने (Nifty) 0.44 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टीने 20,222 अंकाची कामगिरी नोंदवली. निफ्टी मिडकॅपने 0.28 टक्क्यांची वाढ झाली तर निफ्टी स्मॉलकॅपने 0.41 टक्क्यांची वाढ झाली. बाजारातील दिग्गज स्टॉक चमकदार कामगिरी बजावत असताना पेनी शेअरने (Penny Stock) पण जोरदार कामगिरी बजावली आहे. सोमवारी 18 सप्टेंबर 2023 रोजी हे स्टॉक चांगला परतावा देण्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांचा आहे. कोणते आहेत हे छोटूराम शेअर?
या कंपन्यांनी गाजवला दिवस
निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी एनर्जी, निफ्टी रिअॅल्टी यांनी चांगला परतावा दिला. तर निफ्टी 50 इंडेक्समधील दिग्गज बजाज ऑटो, भारती एअरटेल, एमअँडएम, बीपीसीएल, एशियन पेंट्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांना मोठी झेप घेता आली नाही. शुक्रवारी या कंपन्या लाल रंगात न्हाल्या. 1052 स्टॉक आघाडीवर होते. तर 945 शेअरला कामगिरी बजावता आली नाही.
या पेनी स्टॉकवर ठेवा लक्ष
अल्फास इंडस्ट्रीजचा शेअर 2.40 रुपयांवर होता. त्यात 4.35 टक्क्यांची उसळी दिसली. तर क्रिधन इन्फ्रा हा शेअर 2.6 रुपयांवर होता. त्यात 4 टक्क्यांची वाढ आली. इम्पेक्स फेरो टेक 3.45 रुपयांचा हा शेअर 4.55 टक्क्यांनी वधारला. फ्युचर रिटेल शेअरचा भाव 3.65 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यात 4.29 टक्क्यांची उसळी आली.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.