नवी दिल्ली : कोणचं नशीब केव्हा गिरकी घेईल आणि ती व्यक्ती मालामाल होईल, हे कोणालाच सांगता येत नाही. शेअर बाजार (Share Market) ज्याला कळला, तो तर या समुद्रातून कोट्यवधी रुपये रात्रीतूनच छापतो. त्याची रक्कम एकाच रात्री डबल होते. शेअर बाजार हा जुगार नाही, त्यासाठी अभ्यास तर लागतोच पण संयम ही लागतो. शेअर बाजारात हौसे, नवसे, गवसे सर्वच जण रात्रीतून श्रीमंत होण्यासाठी येतात आणि सर्व काही गमावून बसतात. पण ज्यांचा हा व्यवसाय आहे, त्यांच्यासाठी स्ट्रॅटर्जी महत्वाची असते. त्याआधारे ते योग्य डाव लावतात आणि कमाई करतात. कोण आहेत हे बाजारातील महागुरु.
राधाकिशन दमानी
डी-मार्ट हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. या मॉलचे मालक राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) यांना शेअर बाजारात गुरु मानण्यात येते. भारतीय शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला हे पण त्यांना गुरु मानत असत. त्यांनी अवघ्या 24 तासात त्यांची संपत्ती दुप्पट केली. रात्रीतूनच शेअर बाजारात त्यांची गुंतवणूक दुप्पट झाल्याने ते देशातील टॉप श्रीमंतांच्या यादीत पुढे आले.
रिटेल कंपनी डी-मार्ट
राधाकिशन दमानी देशातील प्रमुख रिटेल कंपनी डी-मार्टचे (D-Mart) संस्थापक आहेत. ते फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत 8 व्या स्थानावर आहेत. ते आज 2.26 लाख कोटींचे मालक आहेत. 1995 मध्ये त्यांनी गुंतवणुकीचे धोरण बदलले. कमी मूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घ काळ शेअर कायम ठेवण्याचे आणि गुंतवणूक वाढविण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले. एचडीएफसी बँकेच्या आयपीओमध्ये पैसा लावणे, त्यांना फायदेशीर ठरले.
रात्रीतून पैसा डबल
20 मार्च 2017 रोजीपर्यंत राधाकिशन दमानी केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते. परंतु, 21 मार्च रोजी चमत्कार झाला. शेअर बाजार उघडताच, त्यांची संपत्ती 100 टक्क्यांनी वाढली. त्यांच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आणि त्यांची संपत्ती गोदरेज कुटुंब आणि राहुल बजाज यांच्यापेक्षा जास्त झाली. डीमार्टचा शेअर 604.40 रुपयांवर लिस्ट झाला. तर इश्यु प्राईस 299 रुपये ठेवण्यात आला होता. गुंतवणूकदारांना 102 टक्के रिटर्न मिळाला.
अशी व्यवसायात घेतली उडी
दमानी यांनी सुरुवातीच्या काळात बॉल बिअरिंगचा व्यवसाय सुरु केला. त्यात त्यांना तोटा झाला. त्यांनी हा व्यवसाय बंद केला. वडिलांच्या मृत्यूनंतर भावासोबत त्यांनी स्टॉक मार्केट ट्रेडिंग सुरु केले. त्यांनी सुरुवातीला छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सुरु केली. 1990 पर्यंत या गुंतवणुकीतून त्यांनी कोट्यवधी कमावले.
हा आहे यशाचा मंत्र