नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : म्युच्युअल फंडात (Mutual Fund Investment) गुंतवणूक करुन तुम्ही पण बम्पर कमाई करु शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, इतर योजनांपेक्षा अधिकची कमाई करता येते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजारावर आधारीत असते. त्यामुळे या योजनेत जोखीम अधिक असते. गेल्या काही वर्षांपासून मिड कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. हे फंड मिडकॅप कंपन्यांमध्ये (Midcap Companies) गुंतवणूक करतात. योग्य फंडची निवड केल्यास, गुंतवणुकीची वेळोवेळी समीक्षा केल्यास फायदा होऊ शकतो. तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. काही फंड्सने गेल्या तीन वर्षांत 40 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बँका, पोस्ट ऑफिसच्या योजनांपेक्षा अधिकची कमाई करुन देते.
क्वांट मिडकॅप फंड
क्वांट मिडकॅप फंडने ग्राहकांना गेल्या तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर जोरदार परतावा दिला आहे. या फंडने 38.54 टक्के रिटर्न दिला आहे. या मिडकॅप फंडची एकूण संपत्ती 2,531.32 कोटी रुपये आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही फंडची पूर्ण माहिती आणि कामगिरी पाहणे महत्वाचे आहे. किती वर्षांसाठी गुंतवणूक करणार आहात, त्याचे पण गणित मांडणे आवश्यक असते.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडने पण चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना या फंडने 3 वर्षांत 28.58 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षांत गुंतवणूकदारांना 37.75 टक्के रिटर्न मिळाला आहे. तर या मिडकॅप फंडची नेट एसेट 5,236.88 कोटी रुपये आहे.
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड
परताव्याबाबत एसबीआयाच मॅग्नम मिडकॅप फंड पण दमदार आहे. या फंडने गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यांना 34.88 टक्क्यांचा बम्पर रिटर्न दिला आहे. या मिडकॅप इक्विटी फंडची नेट एसेट 11,808.91 टक्के आहे.म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बँका, पोस्ट ऑफिसच्या योजनांपेक्षा अधिकची कमाई करुन देते.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड
गेल्या तीन वर्षांत निप्पॉन इंडिया मिड कॅप फंडने पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ग्राहकांना या फंडने 33.33 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंडची नेट एसेट 17349.68 कोटी रुपये आहे. गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडची माहिती घेऊनच त्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.
सूचना : हा म्युच्युअल फंडचा केवळ लेखाजोखा आहे. या फंडची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.