नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) तुम्ही करोडपती होऊ शकता, तर एक चुकीचा निर्णय तुम्हाला कंगाल करु शकतो. त्यामुळे अभ्यासाशिवाय आणि तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय बाजारात गुंतवणूक करु नका. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी एकाच स्टॉकवर नशीब आजमावयला नको. हा काही जुगार नाही. व्यवस्थित गुंतवणूक केल्यास आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक (Investment) केल्यास तुम्हाला फायदा होतो. स्टॉक मार्केटमध्ये अनेक छुपे रुस्तम असतात. हे मल्टिबॅगर स्टॉक (Multibagger Stock) तुम्हाला मालामाल करतात. पण त्यासाठी तुम्हाला खोदकाम करावे लागते. आता 1.55 रुपयाचा शेअर 72 रुपयांवर पोहचल्यावर काय होईल? हे वेगळं सांगायला नको, या स्टॉकच्या रॉकेट भरारीने अनेक गुंतवणूकदार कमी कालावधीत मालामाल झाले. त्यांना एकदम लॉटरी लागली. त्यांचा मोठा फायदा झाला.
Raj Rayon Industries असे या शेअरचे नाव आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून या शेअरमध्ये पडझड झाली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या 6 महिन्यात हा शेअर 352.83 टक्के वधारला. आतापर्यंत या शेअरमध्ये 95 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 4,545.16 टक्क्यांचा फायदा करुन दिला. गेल्या 5 वर्षांत या शेअरने अविश्वसनीय असा 20,471.43 टक्के रिटर्न दिला आहे.
एका वर्षात 1 लाखांचे झाले 46 लाख
एक वर्षापूर्वी 23 मार्च 2022 रोजी Raj Rayon Industries च्या शेअरची किंमत अवघी 1.55 रुपये होती. त्यानंतर या शेअरमध्ये जोरदार उसळी आली. हा शेअर 72 रुपयांवर पोहचला. म्हणजे या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षांत 46 पटीत परतावा दिला. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 4,545.16 टक्क्यांचा फायदा करुन दिला. गेल्या 5 वर्षांत या शेअरने अविश्वसनीय असा 20,471.43 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षात एक लाख रुपयांचे या शेअरने 46 लाख परतावा दिला.
तिमाही निकाल निराशाजनक
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीचे निकाल निराशाजनक आहे. कंपनीने या काळात 2.29 कोटी रुपयांचा तोटा झाला. तर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत या कंपनीने 672.71 कोटी रुपयांचा नफा मिळवला. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीच्या विक्रीत वाढ झाली. ही विक्री 26.01 कोटी रुपयांची झाली. पण तरीही या कंपनीने बाजारात धुमाकूळ घातला आहे. पेन्नी शेअर, बाजारात धूमकेतू सारखे असतात.
हा केवळ कंपनीच्या कामगिरीची आलेख आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीपूर्वी शेअर, कंपनीचा अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला अत्यंत महत्वाचा असतो.