नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) सध्या घसरणीचे वातावरण आहे. अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. बाजारात चढउताराचे सत्र सातत्याने सुरु आहे. अस्थिर वातावरणामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यातच कच्चे तेल आणि डॉलरच्या किंमती घसरत असल्याने सर्वच जणांनी सोने आणि चांदीकडे (Gold Silver Investment) मोर्चा वळवला आहे. अशा ही परिस्थितीत शेअर बाजारात काही शेअर मात्र त्यांचा करिष्मा दाखवत आहे. या शेअरने दिग्गज कंपन्यांपेक्षा गुंतवणूकदारांचे नशीब चमकावले आहे. त्यांचा मोठा फायदा करुन दिला आहे. अडचणीच्या काळात त्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.
गुजरातमधील सिंथेटीक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ज्योती रेजीन एडहेसिव्सने (Jyoti Resins And Adhesives) अनेक गुंतवणूकदारांचे नशीब पालटले आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या 15 वर्षांच्या चढउतारात कंपनीने दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा जोरदार फायदा करुन दिला. त्यामुळे त्यांचा मोठा फायदा झाला आहे.
ज्योती रेजीन एडहेसिव्स कंपनीचा शेअर मार्च 2008 मध्ये 0.89 रुपये होता. आता या शेअरने 1100 चा आकडा पार केला आहे. म्हणजेच गेल्या 15 वर्षांत या कंपनीच्या शेअरने 1,25,539 टक्क्यांची उसळी घेतली आहे. 2013 मध्ये हा शेअर 3.68 रुपयांवर होता. या कंपनीचे उत्पादने बाजारात युरो 7000 या नावाने ओळखले जातात.
10 हजाराचे झाले 1.25 कोटी
या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2008 साली या कंपनीत 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर तो आज कोट्याधीश झाला असता. त्याच्या दहा हजारांचे मूल्य आज 1.25 कोटी रुपये झाले असते. आकड्यानुसार, या कंपनीच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे या कंपनीवरील कर्जही संपले आहे. ही कंपनी कर्जमुक्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीची एकूण विक्री 35 टक्के वाढली. विक्रीचा आकडा 181.96 कोटी इतका वाढला. 2008 मध्ये हा आकडा केवळ 2.04 कोटी रुपये होता.
इतकी झाली घसरण
मंगळवारी ज्योती रेजीन एडहेसिव्स कंपनीच्या शेअरमध्ये 1.09 टक्के तेजी आली. हा शेअर 1,127 रुपयांवर व्यापर करत होता. गेल्या पाच दिवसांपासून या स्टॉकमध्ये 2.63 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या एका महिन्यात हा शेअर 12.19 टक्के तुटला. सहा महिन्यात या शेअरमध्ये 31.92 टक्क्यांची घसरण दिसून आली. गेल्या वर्षभरात या शेअरने 80.29 टक्क्यांची झेप घेतली.
हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतणुकीपूर्वी अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.