नवी दिल्ली : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक भाषा, बोलीभाषा, संस्कृती, पंरपरा, प्रथा, पुजा पद्धती सर्वच काही अगणित आहे. देशातील काही राज्ये श्रीमंत (India’s Richest State) आहेत, तर काही गरिब. प्रत्येक राज्यात तुम्हाला त्या राज्याचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास मिळेल. तर काही राज्यांमध्ये कमालीची गरिबी दिसेल. देशातील हे राज्य सर्वात धनवान आहे. भारताच्या श्रीमंतीचा राजमार्ग याच राज्यातून जातो. देशाच्या विकासात आणि श्रीमंतीत हेच राज्य सर्वाधिक भर घालत आहे. देशातील आर्थिक विकासात काही राज्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यात या राज्यानं मोठी भूमिका बजावली आहे. कोणते आहे श्रीमंत राज्य ?
निवडीचे काय निकष
भारताच्या कोणत्याही राज्याच्या श्रीमंतीचे काही निकष आहेत. ही विविध निकष आहेत. यामध्ये GSDP, प्रति व्यक्ती उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक, गरीबीचा स्तर, रोजगार आणि बेरोजगारी इत्यादी. सकल राष्ट्रीय उत्पादनात राज्याचा वाटा किती आहे, हा पण एक निकष आहे. राज्यात एका निश्चित कालावधीत कोणत्या सेवा आणि उत्पादन होते हे पण तपासण्यात येते. हे निकष कोणत्या राज्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महत्वाचे आहेत.
महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य
भारतातील सर्वात श्रीमंत राज्य अर्थातच महाराष्ट्र आहे. 400 दशलक्ष अमेरिकी डॉलर GSDP सह महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य आहे. या ठिकाणी 45 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते. बॉलिवूड, अभिनेता, अभिनेत्री, मोठे उद्योजक, लोकप्रिय व्यक्ती मुंबईत राहतात.
सोयाबीन, ऊसासह कापसाची मोठी बाजारपेठ
देशातील सर्वात मोठे मेट्रो शहर मुंबई महाराष्ट्रात आहे. तसेच शिक्षणासाठी पुणे हे शहर प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटनस्थळे आणि धार्मिकस्थळे याच राज्यात आहेत. चित्रपट उद्योग, अनेक मोठं मोठे उद्योग महाराष्ट्रातील अनेक एमआयडीसीमध्ये आहेत. देशाच्या विकासात या उद्योगांची भरीव मदत होते. कृषी क्षेत्राकडून पण मोठी मदत मिळते. सोयाबीन, ऊसासह कापसाचे मोठे उत्पादन महाराष्ट्रात होते.
गरिबीमध्ये यांचा क्रमांक पुढे
देशातील ही पाच राज्य सर्वात गरीब आहेत. छत्तीसगड हे देशातील सर्वात गरीब राज्य आहे. या राज्यात गरिबीचा दर 37% आहे. या राज्यात अनेक लोक दारिद्रयरेषेखाली राहतात. दुसऱ्या क्रमांकावर झारखंड हे राज्य आहे. याठिकाणचा गरिबीचा दर 36.96 टक्के आहेत. त्यानंतर मणिपूर, अरुणाचल प्रदेश, बिहार यांचा क्रमांक लागतो. बिहारमध्ये विकास कामांना चालना मिळाली असली तरी हे प्रमाण कमीच आहे.