नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतींनी आज महागाईची वर्दी दिली आहे. सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Update) चढउतार सुरु आहेत. पण आज भाव वधारले आहेत. दिल्ली सराफा बाजारानुसार, सोन्यात तेजीचे सत्र आले, भाव 60417 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर चांदीचा भाव 74226 रुपये प्रति किलोवर पोहचला. या आठवड्यात मंगळवारी सोने 249 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. तर सोन्यासोबत चांदीने पण उसळी घेतली. मंगळवारी चांदी 358 रुपयांनी महागली. चांदीचा भाव 74226 रुपये प्रति किलोवर बंद झाला. शुक्रवारी चांदी 547 रुपयांनी स्वस्त होऊन 73868 रुपये प्रति किलोवर पोहचली.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 249 रुपयांनी स्वस्त होऊन 60417 रुपये, 23 कॅरेट सोने 249 रुपयांनी स्वस्त होऊन 60176 रुपये, 22 कॅरेट सोने 228 रुपयांनी स्वस्त होऊन 55342 रुपये, 18 कॅरेटचे सोने 186 रुपयांनी घसरले आणि 45312 रुपयांवर आले. 14 कॅरेट सोने 135 रुपयांनी स्वस्त होऊन 35343 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
सोने 400 रुपये तर चांदी 5700 रुपयांनी स्वस्त
सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 463 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. तर चांदी जवळपास 5754 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. सोने-चांदीने गेल्या 19 एप्रिलपासून मोठी झेप घेतलेली नाही. किमतीत चढउतार सुरु असून या मौल्यवान धातूवर आंतरराष्ट्रीय बाजाराच मोठा दबाव दिसून येत आहे.
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 3 मे रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम, 56,650 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याने प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांची उसळी घेतली आहे. तर चांदीने एक किलोमागे 700 रुपयांची आघाडी घेतली. आज एक किलो चांदीसाठी खरेदीदारांना 76,800 रुपये मोजावे लागणार आहे.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.