मुंबई : आज सोन्याच्या दरात (gold rate) किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46,400 इतके होते. तर आज गुरुवारी 22 कॅरट सोन्याचे (gold) दर प्रति तोळा 46,410 इतके झाले आहेत. तर 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील तोळ्यामागे अवघ्या दहा रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 24 कॅरट सोन्याचा दर हा प्रति तोळा 50,620 इतका होता, तर आज गुरुवारी 24 कॅरट सोन्याचा भाव 50,630 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात (silver rate) मोठी घसरण पहायला मिळत आहे. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 55,900 रुपये इतके होते. आज चांदीचे दर घसरून प्रति किलो 55,600 रुपये इतके झाले आहेत. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलो मागे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जारी केले जातात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू होताच. तर दुसऱ्यांदा सायंकाळच्या सुमारास त्यामुळे सोन्याच्या दरात शहारानुसार तफावत आढळून येते.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46410 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50630 एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 46490 इतका असून, 24 कॅरट सोन्याचा रेट प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46490 एवढा आहे, तर 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46490 तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 50710 रुपये इतका आहे.औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46450 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 50700 इतका आहे.