CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले

| Updated on: Apr 07, 2022 | 9:36 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol diesel rates) वाढ सुरू असतानाच आज दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले
आजचे इंधन दर
Image Credit source: twitter
Follow us on

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol diesel rates) वाढ सुरू असतानाच आज दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज इंधनाचे (Fuel) दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा (Petrol) दर प्रति लिटर 105.41 रुपये लिटर आहे. तर डिझेलचे दर 96.67 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये आज पेट्रलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.85 रुपये एवढा आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या 22 मार्चपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आज इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असून, त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव

आज राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपये आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 119.33 रुपये लिटर तर डिझेल 102.65 रुपये लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 120.11 रुपये लिटर आणि डिझेल 102.84 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 119.07 आणि 102.67 एवढा आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 119.11 रुपये लिटर तर डिझेल 101.83 रुपये आहे.

सीएनजी महागला

महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये इंधनाचे दर प्रति लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही जास्त वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत असतानाच दुसरीकडे महागाईचा आणखी एक झटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सीएनजीचे दर वाढले (CNG prices hike) आहेत. आज सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 2.50 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचा दर आता 69.11 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडकडून (IGL)एप्रिल महिन्यात तीनदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात सीएनजीच्या दरात तीनदा वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर प्रति किलोमागे 9.10 रुपयांनी महागले आहेत.

एप्रिल महिन्यात तीनदा वाढ

एकीकडे पेट्रोल,डिझेलचे दर वाढत आहेत, त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मात्र दुसरीकडे आता सीएनजीच्या दरात देखील वाढ सुरू असल्याने महागाईमुळे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. आठवडाभरात सीएनजीचे दर तीनदा वाढवण्यात आले आहेत. एक एप्रिलला सीएनजीच्या दरात 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर चार एप्रिलला सीएनजीच्या दरात 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली तर सहा एप्रिल रोजी सीएनजीचे दर 2.50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. तीनदा दरवाढ झाल्याने सीएनजीचे दर प्रति किलोमागे 9.10 रुपयांनी वाढले आहेत. येत्या काळात सीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

BSNL-MTNL: विलीनीकरणाला कर्जाचा डोंगर आडवा, देशभरात लाखभर 4-G टॉवर!

AUTO TRACKER: ‘ह्युंदाई’ला सोशल झळ, वाहन विक्रीचा टक्का घसरला; ‘ही’ कंपनी टॉप