पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या (Diesel) किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सलग 23 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात शेवटची वाढ सहा एप्रिल रोजी करण्यात आली होती. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. 22 मार्च ते सहा एप्रिल या काळात पेट्रोल, डिझेलचे दर तब्बल दहा रुपयांपेक्षाही अधिक महाग झाले, मात्र त्यानंतर दरवाढीला ब्रेक लागला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये लिटर आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 96.67 रुपये लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Mumbai Today) प्रति लिटर 120.51 रुपये असून, डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल, डिझेल अनुक्रमे 110.85 आणि 100.94 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 115.12 आणि डिझेलचा दर प्रति लिटर 99.83 रुपये आहे.
पेट्रोलियम कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये प्रति लिटर असून, डिझेलचे दर 104.77 रुपये प्रति लीटर आहे. परभणीमध्ये पेट्रोल 123.51 रुपये लिटर तर डिझेल प्रति लिटर 106.10 रुपये लिटर आहे. पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 120.20 रुपये तर डिझेलचा भाव प्रति लिटर 103.10 रुपये एवढा आहे. नागपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.40 आणि 103.73 रुपये लिटर आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सर्वच राज्यांना इंधनावर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. अनेक राज्यात पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट आकारण्यात येतो, त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतात. मी सर्व राज्यांना आवाहन करतो की त्यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, दरम्यान मोदी पूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील राज्यांना व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. केंद्राने आधीच एक्साईज ड्यूटीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, आता राज्यांनी देखील कपात करावी असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी म्हटले होते.