मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. गेल्या 21 मे रोजी केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल, डिझेलच्या एक्साईज ड्यूटीमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 22 मेला पेट्रोलच्या दरात प्रति लिटर साडेनऊ रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लिटर सहा रुपये कपात झाली. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र जरी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असले तरी दुसरीकडे इतर इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ज्यामध्ये विमानइंधन, एलपीजी, सीएनजी, पीएनजी या सारख्या इंधनाचा समावेश आहे. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असताना देखील देशात पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर ठेवण्यात आले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी आज जारी केलेल्या नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.10 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.3 तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेल दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. राज्याच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना करायची झाल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल हे दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे अद्यापही मुंबईमध्ये मिळत आहे.
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 106.35 | 94.28 |
पुणे | 106.10 | 92.58 |
नाशिक | 106.22 | 92.70 |
नागपूर | 106.65 | 93.14 |
कोल्हापूर | 106.02 | 92.54 |
पेट्रोल, डिझेलच्या किमती या कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असल्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारत कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल, डिझेलच्या किमती देखील वाढतात. व कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास इंधनाच्या किमती कमी होतात. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी करण्यात येतात.